
Bhandardara Dam Latest News: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढत असल्याने भंडारदरा धरणातून विसर्ग वाढवून तो मंगळवारी (ता. २५) सकाळी ५ हजार ५१५ क्युसेकने करण्यात आला. भंडारदऱ्यातील विसर्गामुळे निळवंडे धरणातही पाणी वेगाने जमा होत आहे.
नगर जिल्ह्यामध्ये अजूनही पुरेसा पाऊस नाही. मात्र तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी पट्ट्यात पाऊस सुरू असल्याने पाणी जमा होत आहे. ११ टीएमसी क्षमतेचे भंडारदरा धरण ८३ टक्के भरल्यानंतर वरील पाण्याची आवक पाहता सोमवारी (ता. २४) भंडारदरा धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. मंगळवारी (ता. २५) हा विसर्ग वाढवून तो सकाळी ५ हजार ५१५ करण्यात आला. भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा ही वेगाने वाढत असून हे धरण ४५ टक्के भरले आहे. मुळा धरणात ५२.३५ टक्के पाणी आले असून ६ हजार ९५१ क्युसेकने आवक सुरू आहे.
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातूनही विसर्ग वाढवून तो ३,१५५ क्युसेकने करण्यात आला आला. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे त्या भागातील धरणे भरू लागल्याने भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. मंगळवारी (ता. २५) दुपारी बारा वाजता सिद्धटेक येथील दौंड पुलाखाली भीमा नदी २९,०४१ क्युसेकने वाहत होती. प्रशासनाकडील नोंदणीनुसार मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत रतनवाडी येथे १९७ मिलिमीटर, घाटघरला ८९, पांजरे ७३, वाकी येथे ४३ व भंडारदरा येथे ५६ मिलिमीटर पाऊस पडला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.