Dam Water Agrowon
ताज्या बातम्या

Dam Water Storage : पश्चिम विदर्भात वेगाने वाढतोय प्रमुख प्रकल्पांतील साठा

Team Agrowon

Akola News : या महिन्यात मागील १० दिवसात काही भागांत दोन वेळा अतिवृष्टीचा तडाखा बसला. दुसरीकडे या पावसामुळे प्रकल्पांना मोठा दिलासा भेटला आहे. वाण, काटेपूर्णा या प्रकल्पात या काळात दुप्पट साठा तयार झाला आहे. सध्या आवक सुरु असल्याने साठा वाढत चालला आहे. या भागातील प्रमुख प्रकल्प असलेल्या वाण प्रकल्पात शनिवारी (ता. २९) ५६.४१ दलघमी एवढा साठा झालेला आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या ६८.८३ टक्के आहे.

गेल्या वर्षी याच दिवशी ६४.३२ टक्के साठा होता. प्रकल्पात सातपुड्यातून आवक होत असल्याने निर्धारीत साठा ठेवण्याच्या उद्देशाने वाण प्रकल्पाचे दोन दरवाजे ५० सेंटिमीटर उघडून नदी पात्रात ५२.०८ घनमीटर विसर्ग करण्यात आला. काटेपूर्णा प्रकल्पही वेगाने भरत आहे. शनिवारी प्रकल्पात ५१.९६ दलघमी साठा झालेला होता. क्षमतेच्या ६०.१७ टक्के इतका साठा सध्या झालेला आहे.

हे दोन्ही प्रकल्प १५ दिवसांपूर्वी सध्याच्या साठ्यापेक्षा ५० टक्के कमी क्षमतेत भरलेले होते. दोन्ही प्रकल्पात मागील १० दिवसात अधिक साठा वाढ झाली आहे. जिल्ह्यातील निर्गुणा हा मध्यम प्रकल्प ९२.६२ टक्के भरला आहे. उमा प्रकल्प १०० टक्के भरला तर दगडपारवा प्रकल्पा ७५.८५ टक्के साठा झाला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात अद्याप केवळ ३.५८ टक्के इतकाच साठा आहे. या प्रकल्पाची क्षमता ९३.४० दलघमी असून प्रत्यक्षात केवळ ३.३४ दलघमी इतकाच साठा आहे. प्रकल्पात मराठवाड्यातून पाण्याची आवक होते. सध्या त्या भागात जोरदार पाऊस झालेला नसल्याने प्रकल्पात पुरेशा प्रमाणात पाणी आवक सुरु झालेली नाही.

याच जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प सध्या १८.२६ दलघमी इतका भरला. २६.३४ टक्के साठा झाला आहे. याच जिल्ह्यातील पेनटाकळी हा एक मोठा प्रकल्प असून त्यात २७.६५ दलघमी साठा आहे. सरासरीच्या ४६.१० टक्के पाणी झालेले आहे. इतरही प्रकल्पात मोठ्या प्रमाणात साठ वाढ होण्यास मदत झाली.

या भागात बऱ्याच तालुक्यात २१ व २७ जुलैला जोरदार पाऊस झालेला आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना मोठे पूर वाहले. शेती व पिकांचे प्रचंड नुकसानही झालेले आहे. दुसरीकडे हा पाऊस प्रकल्पांसाठी संजीवनी ठरला. प्रकल्पसाठ्यात वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Policy : जगात भारतीय शेतकरी सरकारी धोरणांचे बळी; देशात सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांना नकारात्मक आधार

Cotton Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे कापसाचे नुकसान

Vidhansabha Election Amravati : अमरावती जिल्ह्यात वाढले एक लाखांवर मतदार

Women And Child Development State Level Award : परभणी जिल्ह्याला महिला, बाल विकासचा राज्यस्तरीय पुरस्कार

Kolhapur Market Committee : तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम, बाजार समिती अन् अडत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

SCROLL FOR NEXT