Nashik Dam Water : दारणा, भावली धरणांतून विसर्ग

Nashik Rain Update : पाऊस रुसल्याने गोदावरीत पाण्याची प्रतीक्षा होती मात्र इगतपुरी तालुक्यात होणाऱ्या पावसामुळे पाण्याची आवक धरणात होत आहे.
Nashik Dam
Nashik DamAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात प्रामुख्याने इगतपुरी तालुक्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधारेमुळे पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली धरण मंगळवारी (ता. २५) १०० टक्के भरले. तर दारणा धरण भरण्याकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे.

हे पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात येत असल्याने पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे येथून विसर्ग गोदावरी पात्रात सुरू करण्यात आला आहे. येथून ५,५७६ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे हे पाणी जायकवाडीकडे झेपावण्यास सुरुवात झाली आहे.

Nashik Dam
Kolhapur Rain : संभाव्‍य पूरस्‍थितीमुळे कोल्‍हापुरात स्थलांतर सुरू

पाऊस रुसल्याने गोदावरीत पाण्याची प्रतीक्षा होती मात्र इगतपुरी तालुक्यात होणाऱ्या पावसामुळे पाण्याची आवक धरणात होत आहे. बुधवारी (ता. २६) दारणा धरणात ५,५६२ दलघफू पणीसाठा झाला असून ७८ टक्के धरण भरले आहे. तर येथून ३,५८४ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.

भावली धरणात १,४३४ दलघफू पणीसाठा झाला असून १०० टक्के धरण भरले आहे. तर येथून ३८२ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात आवक वाढती आहे. त्यानुसार येथूनही विसर्ग सोडण्यात आल्याने गोदामाई आता खळाळली आहे.

नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून मंगळवारी (ता. २५) सकाळी ३,००० दुपारी ५,५७६ तर सायंकाळी ७,१९० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला होता. तो आता कमी करून बुधवारी (ता. २६) ५,५७६ इतका करण्यात आला आहे. यापूर्वी १२५० कयुसेक विसर्ग सुरू होता.

Nashik Dam
Monsoon Rain Update : कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

जिल्ह्यातील पश्चिम भागातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यांत झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पाणी आल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीत ‘जायकवाडी’च्या दिशेने जाऊ लागले आहे.

इगतपुरी महसूल मंडळात अतिवृष्टी

जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात प्रामुख्याने इगतपुरी तालुक्यात इगतपुरी महसूल मंडलात बुधवारी (ता. २६) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ६९.३ मिमी पाऊस झाल्याने अतिवृष्टीने येथे सर्व परिसर जलमय झाला आहे.

याशिवाय धारगाव महसूल मंडळात ४८ मिमी पाऊस नोंदविला गेला. तर पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्र्वर येथे संततधार सुरू आहे. नाशिक व दिंडोरी परिसरात मध्यम ते हलका पाऊस झाला. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com