Jat Water Crisis Agrowon
ताज्या बातम्या

Water Crisis : यवतला जाणवू लागली पाणी टंचाई

Water Shortage : सुमारे वीस हजारांवर लोकसंख्या असलेल्या यवत गावाला सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे.

Team Agrowon

Pune News : सुमारे वीस हजारांवर लोकसंख्या असलेल्या यवत गावाला सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. सध्या कसेबसे पुरेल इतके पाणी उपलब्ध असले तरी पावसाची हीच स्थिती राहिली तर मात्र पाणी टंचाईची तीव्रता हळूहळू वाढत जाऊन ती उग्र रूप धारण करू शकते, अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

यवत येथे दौंड तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेले एक महत्त्वाचे गाव आहे. आसपासच्या गावांतील नागरिक विविध वस्तूंसाठी यवतच्या बाजार पेठेवर अवलंबून आहेत. त्यामुळे बाहेरून नियमितपणे येणाऱ्या लोकांचाही राबता येथे जास्त आहे. अशा वर्दळीच्या आणि जास्त लोकसंख्या असलेल्या माहामार्गावरील या गावाची पाणी मागणी वाढत चालली आहे. त्यासाठी पूर्वीचे पाणीपुरवठा करणारे स्रोत आता कुचकामी ठरू लागले आहेत.

गावाच्या दक्षिणेकडील भुलेश्वर डोंगरांगांच्या पायथ्याचा शिवार दुष्काळग्रस्तच आहे. उर्वरित दिशांना मात्र बारमाही बागायती क्षेत्र आहे. हे बागायती क्षेत्र जलसिंचनासाठी मोठ्या प्रमाणात कालव्या पाण्यावर अवलंबून आहे. खडकवासला धरणसाखळीतील पाण्याचा उजव्या कालव्याने शेतीसाठी पुरवठा केला जातो. शेतीसोबतच अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनाही याच पाण्यावर अवलंबून आहेत.

तर दुसरीकडे याच पाण्यावर पुणे शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. पाणी टंचाईच्या काळात शासन दरबारी शेती पेक्षा पुणे शहरातील लोकांसाठी पाणी पुरवठ्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीसोबत गावांच्या पाणी पुरवठा योजनाही अडचणीत येतात.

यवत येथील वाढती लोकसंख्या व लोकांचे आरोग्य लक्षात घेऊन येथे शासनाने सुमारे ३० कोटी रुपयांची पेयजल योजना मंजूर केली आहे. या योजनेत जलशुद्धीकरण यंत्रणा, माटोबा तलावातील जॅकवेल, पंपहाऊस, वाड्या वस्त्यांवर पाइपलाइन, यवत स्टेशन, इंदिरानगर, गावठाण, दोरगेवाडी अशा चार ठिकाणी मोठे जलकुंभ (पाण्याच्या उंच टाक्या) बांधण्यात येत आहेत. ही योजना पूर्ण झाल्यावर यवतकरांची पाण्याची अडचण दूर होईल.
- समीर दोरगे, सरपंच

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT