Water Scarcity Agrowon
ताज्या बातम्या

Water Scarcity : धुळे जिल्ह्यातील ९७ गावांत पाणीटंचाईचे संकट शक्य

सर्वेक्षणानंतर प्रशासनाकडून कृती आराखडा तयार

Team Agrowon

धुळे : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर भूजल सर्वेक्षण विभागाचा निरीक्षण अहवाल आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सर्वेक्षणानंतर प्रशासनाने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार जानेवारी ते जून २०२३ दरम्यान जिल्ह्यातील अकरा वाड्या तसेच ९७ गावांना पाणीटंचाईची झळ बसू शकते. त्यासाठी एक कोटी ४ लाखांचा टंचाई कृती आराखडा तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या दोन- तीन वर्षांपासून जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे २०२३ मध्ये जिल्ह्याला पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता अल्प आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५३१.६५ मिमी आहे. मात्र यंदा नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पाऊस झाला. गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. परिणामी, नद्या, विहिरी, तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. जमिनीत ओलावा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अचानक उद्‍भवणाऱ्या नैसर्गिक संकटाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. तो जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.

तथापि, दरवर्षी पाणीटंचाईचे तीन टप्पे करण्यात येतात. यात ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यांनुसार आराखडा सादर होतो. त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत एकाही गावाला पाणीटंचाईची झळ बसली नाही. टंचाईच्या दुसऱ्या टप्प्यात जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील २० गावे व एका वाडीला पाणीटंचाईची झळ बसू शकते. यात साक्री तालुक्यातील सहा तसेच शिंदखेडा तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे.

आराखड्यात नेमके काय?

एप्रिल ते मे २०२३ दरम्यान जिल्ह्यातील ७७ गावे व १० वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासू शकते. त्यात धुळे तालुक्यातील १३, साक्री तालुक्यातील ३८, शिरपूर तालुक्यातील १४ व शिंदखेडा तालुक्यातील ३२ गावांचा समावेश असल्याचे आराखड्यात नमूद आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT