Water Resources Agrowon
ताज्या बातम्या

Water Resources : वऱ्हाडातील नदी-नाल्यांच्या खोलीकरणासह जलस्रोतांचे पुनर्जीवन होणार

अमृत २.० योजनेअंतर्गत जलस्रोतांचे पुनर्जीवन करण्याबरोबरच जलसंधारणाच्या कामांची रस्ता कामांशी सांगड घालत अनेक प्रश्न एकाच वेळी मार्गी लावण्याचे प्रयत्न आमदार वसंत खंडेलवाल यांनी सुरू केले आहेत.

टीम ॲग्रोवन

अकोला : अमृत २.० योजनेअंतर्गत जलस्रोतांचे पुनर्जीवन (Water Resources) करण्याबरोबरच जलसंधारणाच्या (Water Conservation) कामांची रस्ता कामांशी सांगड घालत अनेक प्रश्न एकाच वेळी मार्गी लावण्याचे प्रयत्न आमदार वसंत खंडेलवाल यांनी सुरू केले आहेत. यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

वऱ्हाडातील अकोला०, बुलडाणा, वाशीम या तिन्ही जिल्ह्यांतील विकास कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आमदार खंडेलवाल यांनी सूचना केल्या. अमृत योजना २.० अंतर्गत राज्यातील सर्व शहरांमधील घरांना नळजोडणी देऊन पाणीपुरवठ्याच्या बाबतीत शहर १०० टक्के स्वयंपूर्ण करणे अपेक्षित आहे.

त्यासाठी जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यामध्ये नदी नाल्यांचे खोलीकरण तसेच रुंदीकरण करणे, नदी नाल्यांमध्ये दगडी व सिमेंट बांध बांधणे, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील व तलावांमधील गाळ काढणे, धरण व तलावांचे खोलीकरण करणे, सद्य:स्थितीत सार्वजनिक विहीरी ज्यावरुन छोट्या शहरांना पाणीपुरवठा सुरू आहे त्यांचे खोलीकरण करून दुरुस्ती करणे या बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सुरू असणाऱ्या रस्ता कामांसोबत उपरोक्त कामांची सांगड घालून त्यातून निघणारे गौणखनिज रस्ता कामांसाठी वापरण्यात येणार आहे. ही कामे करीत असताना कोणती खबरदारी घ्यायची याच्या सूचना या बैठकीत खंडेलवाल यांनी दिल्या. जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले उपस्थित होते.

खारपाण पट्ट्यात पाणी जिरवण्यावर भर

खारपाण पट्ट्यातील पाण्यामध्ये असणाऱ्या क्षारांमुळे ते पाणी पिण्याच्या किंवा शेतीच्या कामात येत नाही. या भागातील नदी व नाल्यांचे खोलीकरण करून पावसाचे पाणी या भागात मोठ्या प्रमाणात अडवले आणि जिरवले तर त्या जमिनीतील क्षारांचे प्रमाण काही वर्षात कमी होऊ शकते. यासंदर्भात दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत आ. खंडेलवाल यांची बैठक झाली. या बैठकीला सुरेश खानापूरकर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Poscast: तुरीचे भाव दबावात; सोयाबीनचे दर सुधारले; कापूस व पेरूची आवक कमी; दोडक्याला उठाव

Paddy Crop Damage: नाशिकमधील भात उत्पादक शेतकरी संकटात

Hawaman Andaj: पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यता; राज्यातील अनेक भागात किमान तापमानात होतेय घट

Sugarcane Harvest: वहागावमध्ये शेतकऱ्यांकडून ऊसतोडीसाठी नियमावली

Kolhapur Sugar Factory: 'बिद्री' पाठोपाठ भोगावती कारखान्याकडून सर्वाधिक ऊसदर जाहीर, 'एफआरपी'पेक्षाही अधिक

SCROLL FOR NEXT