Koyna Dam Agrowon
ताज्या बातम्या

Koyana Dam : कोयना धरणातून विसर्ग सुरू

राज्याच्या वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात होत आहे.

टीम ॲग्रोवन

सातारा ः राज्याच्या वीजनिर्मितीच्या (Power Generation) दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस (Heavy Rain In Koyna Dam Area) सुरू असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे धरण व्यवस्थापनाकडून (Dam Management) शुक्रवारी (ता. १२) सकाळी दहा वाजता सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उघडून आठ हजार, तर पायथा वीज गृहातून २१०० असा दहा हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू केला आहे. कोयना नदी (Koyna River) पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने सर्वच धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. कोयना धरण क्षेत्रातील कोयना २००, नवजा १२८ व महाबळेश्‍वर २९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात ४९ हजार ५२४ क्युसेक पाण्याची आवक होत असून, धरणात २४ तासांत ४.१० टीएमसीने वाढ झाली आहे.

धरणात सकाळी आठ वाजता ८७.६० टीएमसी म्हणजेच ८३.२३ टक्के धरण भरले आहे. पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी धरण व्यवस्थापनाकडून शुक्रवारी सकाळी दहा वाजता आठ हजार व पायथा वीजगृहातून २१००, असा दहा हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू केल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे या नदीच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कण्हेर, उरमोडी, वीर धरणांतूनही पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सरासरी १९.५ मिलिमीटर पाऊस झाला असून, पश्‍चिमेकडील तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, या भागातील सातारा २१.१, जावळी ५१.३, पाटण ३६.९, कऱ्हाड ११.४,वाई १३.६ व महाबळेश्‍वर १३०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे शेतातील बहुतांशी कामे ठप्प झाली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: आले दरात सुधारणा; जिऱ्याचे भाव टिकून, कांद्यात काहीसे चढ उतार, गव्हाचे दर स्थिर, पपईची आवक कमीच

Agriculture Scheme: नांगर, रोटाव्हेटरसह १२ अवजारांसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान; यांत्रिकीकरणाला सरकारकडून प्रोत्साहन

Brinjal Farming: दर्जेदार उत्पादनासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापन

Soil Health: सांगलीतील जमिनीत सेंद्रिय कर्ब, नत्र यांची कमतरता

Agriculture Technology: भाजीपाला सुकविण्यासाठी यंत्रणा

SCROLL FOR NEXT