Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : जायकवडीतून सहा तासात चार वेळा वाढविला विसर्ग

सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेदरम्यान चार वेळा प्रकल्पातून केला जाणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात (Jayakwadi inflow) पाण्याची होत असलेली आवक (Heavy Rainfall) पाहता शुक्रवारी (ता. १६) सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेदरम्यान चार वेळा प्रकल्पातून केला जाणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली.

प्रकल्प प्रशासनाच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ६ वाजता जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा ९९.१२ टक्क्यांवर पोहोचला होता. त्यावेळी प्रकल्पात ७५.९८ टीएमसी जिवंत पाणीसाठा तर १०२.५ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला होता. सकाळी सहा वाजता होणाऱ्या आवकेच्या प्रमाणात १८ दरवाजे दीड फुटाने उघडून २८ हजार ७९६ पाण्याचा विसर्ग सुरू होता.

सकाळी सात वाजता १८ दरवाजे २ फूट उघडून विसर्ग ३७ हजार ७२८ क्यूसेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी ९ वाजता १८ दरवाजे अडीच फुटाने उघडून विसर्ग ४७ हजार १६० क्युसेक करण्यात आला. सकाळी दहा वाजता उघडलेले १८ दरवाजे तीन फूट उघडून विसर्गात वाढ करत तो ५६,५९२ क्युसेक करण्यात आला. दुपारी बारा वाजताच्या सुमारास प्रकल्पाचे उघडलेले १८ गेट साडेतीन फुटाने उघडून विसर्गात मोठी वाढ करत तो ७५ हजार ४५६ क्यूसेक करण्यात आला.

प्रकल्पात होणाऱ्या आवके नुसार विसर्गात वाढ अथवा तो कमी केला जाणार आहे.त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याची सूचना जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. नगर नाशिक भागातील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने जायकवाडीच्या पाण्यासाठी झपाट्याने वाढ होत गेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT