Water Crisis  Agrowon
ताज्या बातम्या

Water Crisis : अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा

Water Shortage : पावसाळ्याचे तीन महिने उलटत आले, तरी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : पावसाळ्याचे तीन महिने उलटत आले, तरी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत आहे. आगामी काळात पाऊस पडेल किंवा नाही हे सांगता येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने आगामी काळातील दक्षता म्हणून महापालिका, पालिका, नगर परिषदांना पाणी कपातीचे आदेश दिले आहेत. पावसाळा असूनही निम्म्या जिल्ह्यात चार ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात भुसावळ पट्ट्यातील रावेर तालुक्यात गंगापूर, सुकी, मंगरूळ, मोर (यावल) ही मध्यम प्रकल्प व पाझर तलाव फुल्ल भरले आहेत. यामुळे या दोन तालुक्यांना पाणीटंचाईचा धोका नाही. विशेष म्हणजे या तालुक्यांत उन्हाळ्यात टँकरही लागत नसल्याचे चित्र आहे. भुसावळ शहराला तापी नदीतून पाणीपुरवठा होतो. जी गावाजवळून वाहते.

चोवीस तास नदीला पाणी असते. मात्र पालिकेच्या भोंगळ कारभाराने नागरिकांना दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यातही बारा ते पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात होता. पाण्याबाबत भुसावळकरांना उन्हाळा आणि पावसाळा सारखाच आहे.

तापी नदी असताना भुसावळात अडचणी

भुसावळ शहराला पावसाळ्यातही दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा होतोय. वास्तविक तापी नदी भुसावळजवळून जाते. नदीपात्रातूनच पाणी उचलून ते शुद्ध करून नागरिकांना पुरविले जाते. सध्या नदीतून पाणी वाहून जाते. मात्र भुसावळकरांना दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. भुसावळला हतनूर धरण आहे. त्यातूनच तापीत पाणी सोडले जाते.

जिल्ह्यात होणारा पाणीपुरवठा असा...

गाव दिवसाआड

जळगाव ४

भुसावळ १० ते १२

बोदवड १०

रावेर १

यावल १

सावदा १

मुक्ताईनगर १

पाचोरा ४

भडगाव ३

चाळीसगाव ४

अमळनेर ४

चोपडा ४

पारोळा १३

धरणगाव ९

जामनेर ३

एरंडोल ३

मोठ्या धरणातील पाणीसाठा असा...

धरण पाणीसाठा (टक्के)

हतनूर ३७.२५

गिरणा ३४.१३

वाघूर ५७.०८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरणास मान्यता; तीन शासन निर्णय प्रसिद्ध

Sugarcane Payment : उसाचे पैसे थकविल्याने शेतकऱ्यांचा संताप

Marathwada Rainfall : मराठवाड्यात अपेक्षेच्या तुलनेत पावसाची तूटच

Agriculture Scheme: बोअरिंगसाठी शेतकऱ्यांना मिळणार ४० हजारांचे अनुदान

Tree Geo Tagging : सातारा जिल्ह्यात ५० लाख झाडांचे होणार जिओ टॅगिंग

SCROLL FOR NEXT