Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, अरबी समुद्रावरून वाहणारे जोरदार प्रवाह, कोकण किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात मॉन्सूनचा पाऊस जोर धरणार आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्यात मॉन्सूनचा पाऊस दमदार (Heavy Monsoon Rain) बरसण्यास पोषक हवामान झाले आहे. आजपासून (ता. ६) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain Prediction) (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, अरबी समुद्रावरून वाहणारे जोरदार प्रवाह, कोकण किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात मॉन्सूनचा पाऊस जोर धरणार आहे. कोकण, घाटमाथ्यावर दमदार पाऊस कोसळत असून, धरण क्षेत्रातही पावसाला सुरूवात झाली आहे.

आज (ता. ६) कोकणातील रायगड, रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, चंद्रपूर जिल्ह्यासह नाशिक, पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. पूर्व मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशकडे

उत्तर ओडिशा, दक्षिण झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, मंगळवारी (ता. ५) मध्य प्रदेशकडे सरकले आहे. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून कमी दाबाचे क्षेत्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर कायम आहे. गुजरातपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, चंद्रपूर

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

नंदूरबार, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT