Abdul Sattar Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Suicide : आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी संप्रदायांनी प्रबोधन करावे

वारकरी संप्रदायाने गावोगावी होणाऱ्या भजन कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाद्वारे समाजाला जागृत करण्याचे काम केले.

टीम ॲग्रोवन

पंढरपूर, जि. सोलापूर : वारकरी संप्रदायाने गावोगावी होणाऱ्या भजन कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाद्वारे समाजाला जागृत (Social Awareness) करण्याचे काम केले. यामुळे समाजातील अनेकांचे संसार सुखी झाले आहेत, याच माध्यमातून शेतकऱ्यांचेही प्रबोधन (Farmer Enlightenment) केले, तर शेतकरी कधीही आत्महत्या करणार नाही. त्यासाठी वारकरी सांप्रदायाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शुक्रवारी (ता.४) येथे केले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत वारकरी संप्रदायातील वारकरी व फडकरी समवेत आयोजित प्रबोधनपर बैठकीत मंत्री सत्तार बोलत होते. संत तुकाराम भवन येथे आयोजित या बैठकीस आमदार डॉ. बालाजी किणीकर, बापूसाहेब देहूकर, विठ्ठल पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी आर. एन. कांबळे उपस्थित होते.

कृषिमंत्री सत्तार म्हणाले, की वारकरी, फडकरी यांच्या प्रत्येक शब्दाला समाजात मान असून, समाजाला भजन, कीर्तनाच्या माध्यमातून जागृत करण्याचे काम ते करतात. शेत पिकांमुळे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी झाला तर आत्महत्या हा पर्याय नाही. राज्याचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांचे मंत्री आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी, फडकरी यांनी पुढाकार घ्यावा.

पीकविम्याची भरीव मदत निसर्गाच्या लहरीपणामुळे नैसर्गिक संकटे आली, तर योग्य नुकसान भरपाई देऊ, कृषी मालाला चांगला व योग्य दर देण्याचा प्रयत्न सुरु आहे. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून, राज्य व केंद्र सरकारकडून भरीव मदत करण्यात येणार आहे.

आत्महत्या हा पर्याय नाही

बापूसाहेब देहूकर म्हणाले, की शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची नाही, हे संत तुकाराम महाराज यांनी चारशे वर्षांपूर्वी सांगितले आहे. समुद्राचे पाणी वाढत नाही, दुष्काळ पडला म्हणून कमी होत नाही, हे शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवावे. आत्महत्या हा पर्याय नाही, परंतु परिस्थिती शेतकऱ्यांना हतबल करते आणि शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होतो. सध्याचे शासन हे शेतकऱ्यांची काळजी घेणारे शासन असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT