Vinay Kore Sugar Factory agrowon
ताज्या बातम्या

Vinay Kore Sugar Factory : ...तर ऊस उत्पादकांना बुलेट, परदेशवारी घडवणार, आमदार विनय कोरेंची घोषणा

Warana Sugar Factory : कोल्हापूर जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

sandeep Shirguppe

Kolhapur Warana Sugar Factory : कोल्हापूर जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी कारखान्याचे चेअरमन विनय कोरे यांनी कारखान्यात जादा ऊस येण्यासाठी वेगळाच पायंडा पाडला आहे. मार्च महिन्यात ५० टन ऊस घालणाऱ्या ऊस उत्पादकांसाठी लकी ड्रॉ पद्धत लागू केली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात किमान ५० टन ऊस पुरवठा करणाऱ्या उत्पादकांतून ३ भाग्यवंताना बुलेट मोटरसायकल तर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पाच गटातून ३० टन ऊस घालणाऱ्या पाच शेतकऱ्यांना परदेशवारी घडविण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. दरम्यान आमदार कोरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादकांसाठी नवा पायंडा पाडला आहे.

यावेळी कोरे पुढे म्हणाले की, मार्च महिन्यात अधिक उतारा असतानाही ऊस कमी पडतो. यावर उपाय म्हणून फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या उसास १०० रुपये जादा, १ ते १५ मार्च पर्यंतच्या उसास २०० रुपये तर १६ मार्चनंतर येणाऱ्या उसास ३५० रुपये जादा देण्यात येईल. तसेच उत्पादकांसाठी विशेष लकी ड्रा ही काढण्यात येणार असल्याची घोषणा आमदार कोरे यांनी केली.

वारणेने गतवर्षी अत्यंत काटकसरीने ६० कोटी रुपये कर्जाची परतफेड केली यावर्षी हाच पॅटर्न राबवून अंदाजे १५० कोटी रुपये परतफेड करण्याचा प्रयत्न आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी केलेली कर्जमुक्तीची घोषणा सर्वांच्या सहकार्याने पुर्णत्वास येत आहे. याचबरोबर कारखान्याचे जे जुने सभासद आहेत त्यांना स्वतंत्र शेअर्स विभागून देण्यात येणार आहे.

तर वारणा साखर कारखान्यास सलग ३ वर्षे किमान ४० टन ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना सभासदत्व तर कायम ऊस पुरवठा करणाऱ्या गावांचा कार्यक्षेत्रात समावेश करणार असल्याची माहिती आमदार कोरे यांनी दिली.

यावेळी उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, ऊर्जांकूर प्रकल्पाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, नवशक्ती संस्थेचे अध्यक्ष एन एच पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉ.प्रताप पाटील, कार्यकारी संचालक शहाजी भगत उपस्थित होते. करणार प्रा. एन. आर. चोपडे, प्रा पी बी बंडगर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT