vinay kore agrowon
ताज्या बातम्या

Warana Dudh Sangh : वारणा दूध संघाचा मोठा निर्णय, म्हैस दूध विक्री दरात ३ रुपयांची वाढ

Warana milk : वारणा दूध संघाने १३८९ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल केली असून फरक बिल वाटप पद्धतीत बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

sandeep Shirguppe

Warana Milk : कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध संघानंतर वारणा सहकारी दूध संघाचे मोठ्या प्रमाणात प्रस्त आहे. दरम्यान वारणा दूध संघाची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या कार्यस्थळावर झाली.

यावेळी सध्याच्या म्हैस दूध दरात प्रतिलिटर ३ रुपये वाढ आणि फरक बिल हवे असल्यास १ रुपयांनी वाढ देण्यात येणार असल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी माहिती दिली.

यावेळी आमदार विनय कोरे म्हणाले की, वारणा दूध संघाने १३८९ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल केली असून फरक बिल वाटप पद्धतीत बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानुसार म्हैस दूध उत्पादकास फरक बिल नको असल्यास सध्याच्या दूध दरात प्रतिलिटर ३ रुपये वाढ आणि फरक बिल हवे असल्यास सध्याच्या दरात १ रुपयांनी वाढ देण्यात येऊन अडीच रुपये प्रमाणे फरक बिल देण्याची महत्वपूर्ण घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी वार्षिक सभेत केली.

तसेच कोरोना महामारी आणि जनावरांमध्ये शिरलेल्या लम्पीसारख्या आजारामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला. अशा काळात वारणेने दूध उत्पादकांना दूध दर, विविध सवलती, फरक बिलासारखे लाभ दिलेत. जादा दराचे आमिष दाखवून बाहेरील कंपन्या सहकारी तत्वावरील संस्था मोडीत काढण्याचा कुटील डाव करीत आहेत.

यावर पर्याय म्हणून फरक बिल वाटप पद्धतीत बदल करण्याचा निर्णय वारणेने घेतला आहे. वारणा आणि गावातील सहकारी संस्थांमध्ये करार करण्यात येऊन सभासदाने पुरवठा केलेल्या दुधाची नोंद संघाच्या कार्यालयात होईल, त्यामुळे संस्थांच्या कमिशनमध्येही वाढ करण्यात येणार असल्याची माहिती कोरे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT