rohitr repairing Agrowon
ताज्या बातम्या

सहा महिन्यांपासून रोहित्र दुरुस्तीची प्रतीक्षा

दुशिंगपूर (ता. सिन्नर) येथील गोराणे वस्तीवर गेल्या सहा महिन्यांपासून नादुरुस्त रोहित्र वारंवार मागणी करूनही बदलून दिले जात नसल्याने येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
सिन्नर, जि. नाशिक : दुशिंगपूर (ता. सिन्नर) येथील गोराणे वस्तीवर गेल्या सहा महिन्यांपासून नादुरुस्त रोहित्र (Rohitra) वारंवार मागणी करूनही बदलून दिले जात नसल्याने येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. येत्या दोन दिवसांत जळालेले रोहित्र बदलून न दिल्यास सिन्नर-शिर्डी रस्त्यावर वावी येथे ‘रास्ता रोको’ करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला.

रोहित्र जळाल्याची तक्रार करूनही केवळ वीजबिल भरले नाही; म्हणून तो बदलून दिला जात नसल्याने येथील १३ जोडणीधारक शेतकरी ६ महिन्यांपासून विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पावसात येथील वीज वाहिन्याही पडल्या आहेत. यापूर्वी दुष्काळामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेता आला नाही. तर जोरदार पावसाने खरीप हंगामही वाया गेला.

यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम पिकविण्यासाठी तयारी सुरू केली; मात्र या भागात वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने शेती करायची कशी, पिकांना पाणी द्यायचे कसे. असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे आता रोहित्र येत्या दोन दिवसांत बदलून न दिल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा सरपंच कानिफनाथ घोटेकर, शेतकरी नंदू गोराणे, सुनील गोराणे, सुभाष सरोदे, रावसाहेब सरोदे, चंद्रभान गोराणे, संजय कहांडळ, कैलास सरोदे, शिवाजी गोराणे, बापू गोराणे, निवृत्ती गोराणे आदी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला.  थकीत वीजबिलाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांच्या शेतातील वीज न तोडण्याचे आदेश आयोगाने महावितरणला दिले आहेत; मात्र त्या आदेशाची पायमल्ली येथील वावी उपकेंद्राकडून
सुरू आहे.

पावसाळ्याचे सहा महिने वस्त्यांवर घरगुती वीजपुरवठा बंद राहिला. या काळातदेखील महावितरणकडून देयके पाठवण्यात आली. वीजपंपांच्या थकबाकीपोटी तेरा शेतकऱ्यांनी ६५ हजार रुपये भरले; मात्र अद्याप कार्यवाही नाही. - चंद्रभान गोराणे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Compensation GR : तमिळनाडू सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

Chemical Fertilizers Uses: जमिनीच्या गुणधर्मानुसार रासायनिक खतांचा वापर

Farmers Protest: बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शेतकरी धडकणार

India Bangladesh Trade: बांगलादेश भारतातून ५० हजार टन तांदूळ खरेदी करणार

Sushasan Week: सेवा संवेदनशील आणि गतिशीलतेने द्याव्यात

SCROLL FOR NEXT