Chhatrapati Sambhajinagar News: नागरिकांशी संवाद संवेदनशील आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गतिशीलतेने काम केल्याने सुशासन होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला. .जिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन सप्ताह निमित्त आयोजित जिल्हास्तरीय प्रसार कार्यशाळेत श्री.. पापळकर बोलत होते. या कार्यशाळेत निवृत्त विभागीय आयुक्त भास्कर मुंडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.. अंकित, अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, यांच्यासह विविध कार्यालयाचे विभाग प्रमुख.व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते..Farmer Centric Policy : शेतकरीभिमुख धोरणे राबविण्यास प्राधान्य.विभागीय आयुक्त श्री.. पापळकर म्हणाले, की शासनाच्या सर्व योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत सुशासन ही संकल्पना अस्तित्वात येणार नाही. बदलत्या काळानुसार लोकांच्या अपेक्षा आणि शासनाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत .यासाठी गतिशील आणि संवेदनशील असणे आवश्यक आहे. जनतेचा विश्वास प्रशासनावर वृद्धिंगत व्हावा अशा पद्धतीने त्यांना अपेक्षित असलेला प्रतिसादही दिला गेला पाहिजे असे निर्देश विभागीय आयुक्त पापळकर यांनी प्रशिक्षणातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले..Maharashtra Administrative Tribunal: संचालकपदावरून बोरकर यांना हटविण्याचा प्रस्ताव.जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम घेऊन प्रशासन हे सुशासन करण्याच्या अनुषंगाने लोकाभिमुख करून विविध उपक्रम राबवले. यामध्ये जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी, एक हात मदतीचा, दशसूत्री उपक्रम, अर्ज द्या, कर्ज घ्या, जलसमृद्ध गाव,अशा विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी विभागीय आयुक्तांसमोर सादर केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी आभार मानले. .कायद्याच्या अंमलबजावणी सकारात्मक पद्धतीने करण्यासाठीची संवेदनशीलता आवश्यक असते. त्यातून आपण सुशासन करू शकतो आणि हा विश्वास सर्वांनी लक्षात ठेवून प्रशासनात काम करावे असे सांगितले. काम करत असताना जिल्हा प्रशासनातल्या सर्व घटकांची एक टीम म्हणून काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी समारोपात नमूद केले. प्रस्ताविक उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनाच्या संगीता राठोड यांनी केले. सुशासन सप्ताह अंतर्गत जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये दस्तऐवज प्रमाणीकरण याविषयी माहिती तंत्रज्ञान अधिकारी शरद दिवेकर यांनी सादरीकरण केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.