डॉ. हरिहर कौसडीकरFarming Tips: जमिनीच्या पोतानुसार आणि प्रकारानुसार रासायनिक खतांची निवड करणे उत्पादकता वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. रासायनिक खतांसोबत शेणखत किंवा गांडूळ खताचा वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते..जमिनीचा सामू अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो. जमिनीचा सामू ६.५ पेक्षा कमी असल्यास जमीन आम्लधर्मी आणि ७.५ पेक्षा जास्त असल्यास ती जमीन विम्लधर्मी किंवा अल्कधर्मी मानली जाते. अशा जमिनीत पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते, विशेषतः स्फुरद आणि लोह, जस्त यांसारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना सहजासहजी मिळत नाहीत. अशा अल्कधर्मी जमिनीसाठी जमिनीत आम्लधर्मी प्रकारची खते आणि भूसुधारक वापरणे फायदेशीर ठरते. ही खते जमिनीचा सामू कमी करण्यास मदत करतात आणि लोह, फॉस्फरस आणि झिंकसारख्या स्थिर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवतात. ज्या खतांमुळे जमिनीचा सामू कमी होण्यास मदत होते, अशी खते वापरावीत..आम्लयुक्त रासायनिक खते नत्रयुक्त खतेअमोनिअम सल्फेटनत्र पुरविण्यासाठी हे उत्तम खत आहे कारण याचा स्वभाव आम्लयुक्त असतो. हे सर्वांत प्रभावी आम्लयुक्त परिणाम देणारे खत आहे. हे जमिनीत मिसळल्यावर हायड्रोजन आयन मुक्त करते, ज्यामुळे सामू कमी होतो.अमोनिअम नायट्रेटहे आम्लयुक्त खत आहे. ठिबक सिंचनाद्वारे याचा वापर केल्यास ते जमिनीचा अल्कधर्मीपणा कमी करते. एक आम्लीय स्रोत जमिनीत मिसळल्यावर तत्काळ आणि दीर्घकालीन नायट्रोजन पुरवतो..स्फुरदयुक्त खतेसिंगल सुपर फॉस्फेटमातीमध्ये फॉस्फरस अनेकदा स्थिर होतो, वनस्पतींसाठी उपलब्ध राहत नाही. सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये गंधकाचे प्रमाण असल्याने ते अल्कधर्मी जमिनीसाठी उत्तम आहे.मोनो-अमोनिअम फॉस्फेटहे डीएपी पेक्षा जास्त आम्लयुक्त असते, त्यामुळे ७.५ पेक्षा जास्त सामू असलेल्या जमिनीत अधिक उपयुक्त ठरते.फॉस्फेरिक ॲसिडठिबक सिंचनाद्वारे याचा वापर केल्यास मातीतील क्षारीयता थेट कमी करता येते, कारण जमिनीचा अल्कधर्मीपणा थेट कमी करते आणि स्फुरद उपलब्ध करून देते. .Agri Fertilizer Management: काटेकोरपणे रासायनिक खतांचा वापर गरजेचा.पालाशयुक्त खतेपोटॅशिअम सल्फेटअल्कधर्मी जमिनीत म्युरेट ऑफ पोटॅशऐवजी पोटॅशिअम सल्फेट वापरणे चांगले असते, कारण त्यातील सल्फेट मुळांच्या कार्यक्षेत्रातील सामू कमी करण्यास मदत करते.सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खतेरासायनिक खतांचा वापर करण्यापूर्वी माती परीक्षण करणे आवश्यक आहे, जेणेकरून जमिनीच्या नेमक्या प्रकारानुसार (चुनखडीयुक्त किंवा क्षारयुक्त) खतांची मात्रा ठरवता येईल.अल्कधर्मी जमिनीत लोह आणि जस्ताची कमतरता प्रामुख्याने जाणवते. त्यासाठी, फेरस सल्फेट, झिंक सल्फेट आणि बोरॅक्ससारखी खते सेंद्रिय खतात मिसळून द्यावीत किंवा त्यांची फवारणी करावी. अल्कधर्मी जमिनीत लोह आणि जस्ताची कमतरता असते, ही भरून काढण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर आम्लता वाढवण्यासाठी सल्फेटयुक्त खते सर्वांत प्रभावी ठरतात. .जमिनीचे सुधारकगंधकसामू ८.५ पेक्षा कमी असल्यास गंधकाचा वापर शेणखतात मिसळून करावा. गंधकामुळे जमिनीचा सामू हळूहळू कमी होतो.जिप्समजर जमिनीत चुनखडीचे प्रमाण कमी असेल आणि सामू जास्त असेल, तर जिप्समचा वापर जमिनीच्या सुधारणेसाठी केला जातो. .जमिनीत घडणाऱ्या रासायनिक अभिक्रियाअल्कधर्मी जमिनीत जेव्हा आम्लयुक्त रासायनिक खते (उदा. अमोनिअम सल्फेट) टाकली जातात, तेव्हा प्रामुख्याने खालील रासायनिक अभिक्रिया घडतात.नायट्रीफिकेशन प्रक्रिया हे आम्लयुक्त खतांमधून जमिनीचा सामू कमी होण्याचे सर्वांत मुख्य कारण आहे. जमिनीत असणारे नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर हे सूक्ष्मजीव खतातील अमोनियमचे रूपांतर नायट्रेटमध्ये करतात. या प्रक्रियेत हायड्रोजन आयन मुक्त होतात. जमिनीत हायड्रोजन आयनांचे प्रमाण वाढले, की जमिनीची आम्लता वाढते. पर्यायाने जास्त असलेला सामू कमी होण्यास मदत होते. .कॅटायन एक्स्चेंज अभिक्रिया अमोनिअम सल्फेटसारखी खते जमिनीत विरघळल्यावर त्यातील अमोनिअम आयन मातीच्या कणांवर असलेल्या इतर आयनांना (उदा. कॅल्शिअम) विस्थापित करतात. यामुळे जमिनीत कॅल्शिअम सल्फेट तयार होते. हे द्राव्य स्वरूपात असल्याने अल्कधर्मी जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी करण्यास किंवा ते मुळांच्या कक्षेबाहेर वाहून नेण्यास मदत करते. पोषक तत्त्वांची उपलब्धता वाढणेअल्कधर्मी जमिनीत स्फुरद आणि लोह हे घटक स्थिर होतात, म्हणजेच पिकांना मिळत नाहीत. आम्लयुक्त खतांच्या अभिक्रियेमुळे तयार होणाऱ्या स्थानिक आम्लतेमुळे जमिनीतील अघुलनशील पोषक तत्त्वे विरघळतात आणि पिकांना सहज उपलब्ध होतात. आम्लयुक्त खते हायड्रोजन आयन सोडतात, जे जमिनीतील अल्कली (क्षार) उदासीन करतात आणि मातीचा सामू पिकांसाठी पोषक बनवतात..Soil Health: जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय घटकांचा वापर वाढविणे आवश्यक.रासायनिक खत व्यवस्थापनखते मिसळून द्याचुनखडीयुक्त जमिनीत अमोनिअम सल्फेट जमिनीच्या पृष्ठभागावर न टाकता जमिनीत मिसळून द्यावे, अन्यथा त्यातील नत्र हवेत उडून जाऊ शकतो.माती परीक्षणानुसार वापररासायनिक खतांचा वापर माती परीक्षणानुसार करावा. खते टाकण्यापूर्वी माती परीक्षण करून नेमक्या कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे तपासावे..सेंद्रिय खतांचा आधाररासायनिक खतांसोबत शेणखत किंवा गांडूळ खताचा वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. भूसुधारकजमिनीचा सामू खूप जास्त असल्यास खतांसोबत गंधक किंवा जिप्सम यांसारख्या भूसुधारकांचा वापर माती परीक्षणानुसार करावा..जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांचा वापरजमिनीच्या पोतानुसार आणि प्रकारानुसार रासायनिक खतांची निवड करणे उत्पादकता वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील प्रमुख जमिनींचे प्रकार आणि त्यानुसार शिफारशीत खते खालीलप्रमाणे आहेत.काळी जमीनयामध्ये स्फुरद आणि पालाश मध्यम प्रमाणात असते, पण नत्राची कमतरता असते. यामध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त असू शकते. अमोनिअम सल्फेट आणि नत्र-स्फुरद-पालाशयुक्त संयुक्त खते वापरावीत. सिंगल सुपर फॉस्फेट वापरणे अधिक फायदेशीर ठरते. .लाल किंवा हलकी जमीनअशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते आणि अन्नद्रव्ये लवकर वाहून जातात. यामध्ये नत्र, स्फुरद आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असते. नत्रयुक्त खतांच्या (युरिया) मात्रा विभागून द्याव्यात जेणेकरून नत्र वाहून जाणार नाही. स्फुरदासाठी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा. या जमिनीत नत्र-स्फुरद-पालाशयुक्त संयुक्त खते वापरणे योग्य ठरते. क्षारयुक्त किंवा अल्कधर्मी जमीनया जमिनीचा सामू ७.५ पेक्षा जास्त असतो, जिथे लोह आणि जस्ताची कमतरता जाणवते. आम्लयुक्त खतांचा वापर करावा. अमोनिअम सल्फेट हे नत्राचा सर्वोत्तम स्रोत आहे. स्फुरदासाठी सिंगल सुपर फॉस्फेटला प्राधान्य द्यावे, कारण त्यात गंधक असते. .गाळाची किंवा मध्यम जमीनही जमीन सुपीक असून सर्वसाधारणपणे सर्व पिकांसाठी योग्य असते. पिकाच्या गरजेनुसार संतुलित खतांचा वापर करावा. तृणधान्यांसाठी (गहू, भात) नत्रयुक्त, तर कडधान्यांसाठी स्फुरदयुक्त खतांची निवड करावी. लॅटराईट किंवा जांभा जमीनही जमीन कोकण भागात प्रामुख्याने आढळते. ही जमीन निसर्गतः आम्लधर्मी येथे विद्राव्य फॉस्फेट लवकर स्थिर होते, म्हणून रॉक फॉस्फेट किंवा बोनमिल सारख्या मंद गतीने विरघळणाऱ्या खतांचा वापर करावा.- डॉ. हरिहर कौसडीकर ९४२३१४२२१०(विभाग प्रमुख, मृद् विज्ञान विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.