Kharif Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा

Pune Rain Update : गेले आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पूर्व भागात अजूनही जोरदार पाऊस पडलेला नाही.

Team Agrowon

Pune News : गेले आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पूर्व भागात अजूनही जोरदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अजूनही या भागात पावसाची प्रतीक्षा आहे.

खरीप हंगाम अडचणीत आला आहे. अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्याची स्थिती आहे. पेरण्या झालेल्या ठिकाणी पिके पावसाअभावी सुकत आहेत. त्याचबरोबर पाऊस नसल्याने भूजलपातळी खाल्यावल्याने विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत.

पावसाळ्याचे जवळपास दोन महिने पूर्ण होत आले आहेत. या काळात पूर्व भागात एक ते दोन वेळा तुरळक सरी पडल्या. परंतु काही ठिकाणी मध्यम पाऊस पडला. त्यामुळे इंदापूर, दौंड, शिरूर भागांत काही ठिकाणी पेरण्या झाल्या.

त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पिके सुकू लागली आहेत. दौंड तालुक्यात पावसाने अपेक्षित हजेरी लावली नाही. तालुक्यातील गावतलाव अद्यापही कोरडेच आहेत. पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे.

पुरंदर, बारामतीत पेरण्या खोळंबल्या

जिल्ह्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. दौंड तालुक्यात काही भागांत पावसाच्या केवळ हलक्या सरी पडल्या आहेत. कुसेगाव, रोटी, वासुंदे, जिरेगाव, हिंगणीगाडा या भागातील तलाव कोरडेच आहेत.

विहिरीमधील पाणी पातळीही खालावली आहे. उसाची लागवड तसेच बाजरीसह इतर पिके धोक्यात आली आहेत. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे. पुरंदरच्या पूर्व भाग आणि बारामतीच्या पश्‍चिम भागात पाऊस नसल्याने अजूनही पेरण्या खोळंबल्या आहेत.

एक जून ते २५ जुलैदरम्यान पूर्व भागातील मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटर) ः

शिरूर तालुका ः टाकळी ६८, वडगाव ९१.६, न्हावरा ८३.७, मलठण ३९.८, तळेगाव ७२, रांजणगाव ५१.६, कोरेगाव ७०.२, पाबळ ८५.५, शिरूर १०७.२

बारामती तालुका ः बारामती ५७.९, माळेगाव २६, पणदरे ३९, वडगाव ६०, लोणी ७४.६, सुपा ५५, मोरगाव ३७.५, उंडवडी ९१.४

इंदापूर तालुका ः भिगवण ६५, इंदापूर १५६.४, लोणी १३३.७, बावडा ४५.६, काटी ८८.२, निमगाव ३३.१, अंथुर्णी ६३, सणसर ३७.३

दौंड तालुका ः देऊळगाव ७९.७, पाटस ९८.९, यवत ३४.६, कडेगाव ६०.८, राहू ९८.३, वरवंड ८५.२, रावणगाव ७७.२, दौंड ८२.९

पुरंदर ः सासवड ११२.७, भिवंडी ७४.९, कुंभारवळण ११६.९, जेजुरी ८४.२, परिंचे ९४.७, राजेवाडी ३५.८, वाल्हा ११०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT