Wild Boar Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : वन्य प्राण्यांकडून भाजीपाल्यांचे नुकसान

Wild Animals Damage Crops : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या या भागाला चारही बाजूंनी जंगलाचा वेढा आहे. यामुळे शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे.

Team Agrowon

Buldana News : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या या भागाला चारही बाजूंनी जंगलाचा वेढा आहे. यामुळे शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे. पिकांसह पशुधनावरही संकट ओढवले आहे. वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी होत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

बुलडाणा तालुका ज्ञानगंगा अभयारण्य असा जोडलेला आहे. बहुतांश शेती जंगलालगत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मुक्त वावर असतो. शेतशिवारात या परिसरात बिबट्या व अस्वलाचा धुमाकूळ नेहमीचा झालेला आहे.

रानडुक्कर, सांबर, नीलगाय, हरिण आदी प्राणी बिनधास्त शेतशिवारात शिरतात. हे वन्यजीव कोबी, टोमॅटो, मेथी, मिरची, ऊस व इतर भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान करतात. अनेकदा हिंसक झालेले रानडुक्कर शेतकऱ्यांवर हल्लेही करतात.

सध्या शेतात भाजीपालावर्गीय पिकांची लागवड झाली असून, त्यावर प्राणी ताव मारताना दिसून येतात. तालुक्यातील सोयगाव, शेकापूर, जामठी, मासरूळ धामणगाव, डोमरूळ, धाड या गावांना तर सर्वाधिक वन्यप्राण्यांचा त्रास सहन करावा लागतो. पाण्याच्या शोधात प्राण्यांचे कळप शेतात शिरतात.

शेतकऱ्यांनी केलेल्या उपाययोजना करण्याचाही प्रयत्न केला. अनेक शेतकरी वनविभागाकडे धाव घेत आहेत. वनविभागाचे कर्मचारी या वन्यप्राण्यांना शेतापासून दूर नेण्यासाठी कधीच प्रयत्न करताना दिसत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागतात.

बुलडाणा तालुक्यातील मासरूळ परिसरात सोयगाव मासरूळ रस्त्याला लागून असलेल्या सुभाष सावळे यांच्या शेतात रोज सकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन अस्वल भटकताना दिसले. या परिसरात गेल्या काळात लांडग्यांच्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार झाल्या होत्या. टाकळी शिवारात गणेश नागवे यांच्या शेतातील विहिरीत एक काळवीट पडला होता. तर करडी शिवारात शेतातील विहिरीत २ दिवसांपासून एक कोल्हा पडून होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT