Unseasonal Rain Agrowon
ताज्या बातम्या

Unseasonal Rain : राहुरी, नेवासा, शेवगावात दोन दिवसांपासून धुमाकूळ

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट सुरू आहे. या पावसाने पिकांचे नुकसान सुरूच आहे.

Team Agrowon

Nagar News जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट (Hailstorm) सुरू आहे. या पावसाने पिकांचे नुकसान सुरूच आहे. बुधवारी (ता. २६) सायंकाळी वीज पडून चार जणांचे मृत्यू झाले. एक गायदेखील मृत्युमुखी पडली.

नगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, राहुरी, राहाता तालुक्यांतील अनेक भागांत बुधवारी वादळी पाऊस झाला. काही भागांत गारपीट झाली. या महिन्याभरातील हा चौथा पाऊस होता. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नेवासा तालुक्यातील देडगाव, चांदे, कौठा, अंमळनेर भागांत पावसाने हाहाकार उडविला. देडगाव येथील तांबे वस्ती परिसरात वीज पडून कांदा काढणी करणाऱ्या सविता राजेंद्र बर्फे यांचा मृत्यू झाला. तर कडू तांबे यांच्या वस्तीजवळ वीज पडून गोठ्यातील एक गाय मृत्युमुखी पडली.=

अंमळनेर येथील बेंदवस्ती येथे पिकाला खत टाकीत असताना वीज पडून रावसाहेब भागाजी बोरुडे यांचा मृत्यू झाला. वादळाने चांदे व कौठा, मुळाथडी परिसरातील निंभारी, शिरेगाव, करजगाव भागांत घरांचे व शेतपिकांचे नुकसान झाले.

श्रीरामपूर तालुक्यातील भेंर्डापूर येथे शेतात काम करणाऱ्या मजुरांना घरी नेऊन सोडताना प्रमोद दांगट या शेतकऱ्यांसह अलका रामदास राऊत या शेतमजूर महिलेचा दुचाकीवर वीज पडल्याने मृत्यू झाला.

शेजारी उभी असलेली एक शेतमजूर महिला जखमी झाली. मालुंजे गावांत वीज पडल्याने चार एकरावरील ठिबक संच जळाला. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, मठाचीवाडी, मजलेशहर, गोळेगाव, नागलवाडी, लाडजळगाव, शेकटे, राणेगाव, कोनोशी भागांत गारा पडल्या. तर बोधेगाव, बालमटाकळी हातगाव मुंगी, कांबी या ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. राहुरी तालुक्यातही जोरदार वादळ व पावसाने घरांचे, पिकांचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Variety: ‘बीएआरसी’कडून केळीची ‘म्युटंट’ जात विकसित

Agrowon Agri Expo: सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शन

CCI Procurement: ‘सीसीआय’ची दररोज १ लाख गाठी कापूस खरेदी

Silk Association MoU: परभणी येथील कृषी विद्यापीठ, सिल्क असोसिएशनमध्ये करार

Agriculture Department: लेखा परीक्षण अहवाल न दिल्याने ‘एसएओ’ला नोटीस

SCROLL FOR NEXT