Fertilizer Shortage Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Shortage : खानदेशात ‘पोटॅश’ची अभूतपूर्व टंचाई

Fertilizer Market Rate : खतांच्या वापरात राज्यात आघाडीवर असलेल्या जळगाव जिल्ह्यात पोटॅशचा पुरवठा यंदा विस्कळीतच आहे.

Team Agrowon

Fertilizer Market : खतांच्या वापरात राज्यात आघाडीवर असलेल्या जळगाव जिल्ह्यात पोटॅशचा पुरवठा यंदा विस्कळीतच आहे. सध्या पोटॅशची अभूतपूर्व टंचाई (Potash Fertilizr Shortage) आहे. कृषी यंत्रणा खते मुबलक असल्याचा दावा करतात. परंतु पोटॅशचा पुरवठाच नसल्याने हा दावा फसवा ठरत असल्याची स्थिती आहे.

मध्यंतरी ‘अॅग्रोवन’ने खतांच्या टंचाईबाबत पाठपुरावा केला. यानंतर मार्चमध्ये जळगाव जिल्ह्यात पोटॅशचे तीन रॅक पाठविण्यात आले. परंतु नंतर पुरवठा पुन्हा ठप्प झाला. आता खरीप हंगाम तोंडावर आहे. खतांची मागणी आहे.

खानदेशात केळी पट्ट्यात पोटॅशची मोठी मागणी वर्षभर असते. परंतु मागील एक ते दीड वर्षापासून पोटॅशचा पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना पर्यायी खतांचा उपयोग करावा लागत आहे.

त्यासाठी विद्राव्य खते शेतकरी घेत आहेत. त्यावर अधिकचा खर्च करावा लागत आहे. विद्राव्य खतेही महाग झाली आहेत. यामुळे उत्पादन खर्च व मनःस्तापही वाढला आहे.

केळी पट्ट्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा या भागांत पोटॅशसाठी शेतकरी वणवण करीत आहेत. या भागात मृग बहर किंवा मे, जूनमध्ये लागवडीच्या बागा अधिक असतात. तसेच भाजीपाला पिकेही असतात. यामुळे या भागात शेतकऱ्यांना पोटॅशची अधिक गरज असते. पण पोटॅशसाठी शेतकरी वणवण करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यात सुमारे ३७ हजार टन, धुळे आणि नंदुरबारमध्ये मिळून सुमारे २० हजार टन पोटॅशची गरज असते. परंतु एवढा पुरवठा मागील खरिपात झालाच नाही. जळगाव जिल्ह्यात मागील खरिपात फक्त १६ हजार ६९७ टन पोटॅशचा पुरवठा झाला.

रब्बीतही फक्त १३ हजार ४६८ टन पोटॅशचा पुरवठा झाला. यंदा पुरवठा लक्ष्यांक वरिष्ठ कार्यालयाने मंजूर केला. पण पुरवठ्याचे काय? याबाबत समाधानकार उत्तर यंत्रणा देत नसल्याचे चित्र आहे.

काळाबाजार वाढला

पोटॅशची टंचाई काळाबाजार करणाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. ही मंडळी चांगला नफा बनावट पोटॅश विक्रीतून मिळवीत आहेत. अलीकडेच धुळ्यातील तोंदे (ता. शिरपूर) येथे सुमारे ५७ हजार रुपये किमतीचे बनावट पोटॅश कृषी यंत्रणांनी पकडले. हा प्रकार अनेक भागांत सुरूच आहे. कारण पोटॅश अधिकृतपणे निविष्ठा विक्रेत्यांकडे उपलब्ध होत नाही.

पोटॅशची टंचाई आहे. खत कंपन्या पुरवठा करतात. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातील अडचणी व रशिया - युक्रेनमधील युद्ध यामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे. यंदा पुरवठा सुरळीत होईल, असे वरिष्ठांचे म्हणणे आहे.
- विजय पवार, मोहीम अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद, जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT