Agriculture Credit Society Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Credit Society : कृषी पतसंस्थेतील संचालक, सभासदांचा एकोपा महत्त्वाचा

Cooperative Society : कृषी कर्मचारी पतसंस्थेचे संचालक मंडळ, सभासदांतील एकोपा आणि परस्परांवरील विश्‍वासामुळे पतसंस्थेची प्रगती झाल्याचे दिसते.

Team Agrowon

Solapur News : ‘‘कृषी कर्मचारी पतसंस्थेचे संचालक मंडळ, सभासदांतील एकोपा आणि परस्परांवरील विश्‍वासामुळे पतसंस्थेची प्रगती झाल्याचे दिसते. हा एकोपा असाच कायम ठेवा,’’ असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी नुकतेच पंढरपुरात केले.

सोलापूर जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंढरपूर कार्यालयाला श्री. चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. '

या वेळी विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक मदन मुकणे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, माजी उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, पतसंस्थेचे चेअरमन उदय साळुंखे, सचिव आजिनाथ शिंदे, संचालक हुसेन तांबोळी, विनायक लांबतुरे, उमेशराव मोहिते आदी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘कृषी पतसंस्थेची एकूण सभासदसंख्या, उलाढाल, कर्जवितरण आणि वसुली या सर्व बाबींचे योग्य व्यवस्थापन केले आहे. पतसंस्थेचे सभासदांसाठीचे उपक्रमही कौतुकास्पद आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांतील कृषी कर्मचाऱ्यांसाठी आदर्श असे हे काम आहे.’’

दरम्यान, पतसंस्थेने स्वखर्चातून बांधलेल्या इमारतीची पाहणी त्यांनी केली. या वेळी तालुका कृषी अधिकारी भारत कदम, शिवाजी शिंदे, सूर्यकांत मोरे, संजय वाकडे, कृषी सहायक संघटनचे जिल्हाध्यक्ष विशाल गावडे, धनराज खोत, सागर भोसले, भागवत शिंदे, महेश बाबर, कृषी पर्यवेक्षक पांडुरंग झोळ, सुनील प्रक्षाळे, दीपक ऐवळे, सतीश देठे, रामचंद्र कचरे, सुनील गायकवाड उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Disaster Prediction : नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देण्यासाठी 'अर्ली वॉर्निंग सिस्टिम'; मृत्यूचं प्रमाण घटलं, केंद्र सरकारचा दावा

Soybean Procurement: बीड जिल्ह्यात ३१ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

Marathwada Water Storage: मराठवाड्यातील ८९० प्रकल्पांत ९६.९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Putin India Visit 2025: पुतिन आजपासून भारत दौऱ्यावर, कृषीसह महत्त्वाचे करार शक्य

Soil Health: मातीचे ते मोल किती?

SCROLL FOR NEXT