Bribe Agrowon
ताज्या बातम्या

Bribe : महावितरणचे दोन कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ पकडले

निघोज (ता. पारनेर) येथे महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. ९) दोन हजार आठशे रुपयांची लाच घेताना पकडले.

टीम ॲग्रोवन

नगर ः निघोज (ता. पारनेर) येथे महावितरणच्या (Mahavitaran) दोन कर्मचाऱ्यांना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. ९) दोन हजार आठशे रुपयांची लाच घेताना पकडले. (Arrest In Bribe) तक्रारादाराच्या घरातील मीटर नादुरुस्त झाले होते. ते त्यांनी बदलून नवीन मीटर जोडणीची मागणी केली होती. त्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन हजारांची लाच मागितली होती. शेवटी त्यांना दोन हजार आठशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

निघोज येथील तक्रारदार यांच्या घरातील विजेचे मीटर नादुरुस्त झाले होते. ते त्यांनी बदलून मागितले होते. त्यासाठी आरोपी किशोर बाळासाहेब कळकुटे (वय २३) यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली होती. ती रक्कम त्यांनी विकास अशोक वायदंडे (वय ३०) यांच्याकडे देण्यास सांगितले.

वायदंडे यांनी ती रक्कम लाच म्हणून घेताना लाचलुचपत विभागाने पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. तक्रारदाराने निघोज येथील लोकजागृती सामाजिक संस्थेला या बाबत माहिती दिली होती. त्यानंतर लोकजागृतीच्या सदस्यांनी तक्रारदाराला नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यास सांगून मदत केली. त्यानंतर निघोज येथे सापळा लावत आरोपींना शिताफीने लाच घेताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, सहायक सापळा अधिकारी गहिनीनाथ गमे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार रमेश चौधरी, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, सचिन सुद्रुक, हरून शेख यांच्या पथकाने केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Bank Laon : आर्थिक वर्षे २०२५-२६ ग्रामीण बँकांची दमदार कामगिरी; कृषी कर्ज वाढवण्याचे अर्थ मंत्रालयाचे निर्देश

Post Harvest Logistics: शेतीमाल वाहतुकीदरम्यानची आव्हाने

Agriculture Irrigation: रब्बी हंगामासाठी पाणी नियोजन जाहीर

Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अजितदादांची इच्छा होती ती पूर्ण व्हावी- शरद पवार

Agriculture Reforms: कृषी विकासाची पंचसूत्री

SCROLL FOR NEXT