
सोलापूर ः आठवडाभरापूर्वीच एका तलाठ्याला लाचखोरप्रकरणी (Bribe) पाच वर्षांची शिक्षा झाल्याचे प्रकरण ताजे असताना आता वाटपपत्राची नोंद लावून सातबारा व आठ अ उतारा देण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या छाया बिराजदार (वय २८, रा. स्वामी विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती) या महिला तलाठीला तीन वर्षांची सश्रम (imprisonment for Bribery) कारावासाची शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदरकर यांनी सुनावली.
कौठाळी (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतजमिनीचे वाटपपत्रात नोंद लावून सातबारा व आठ अ उतारा देण्यासाठी गावकामगार तलाठी छाया बिराजदार हिने ५०० रुपये लाच मागितली होती. उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात २२ जुलै २०१४ रोजी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. शासकीय सेवेत असताना शासकीय कामापोटी पदाचा गैरवापर करून लाचेची मागणी केली, लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले, ही बाब साक्षीपुराव्यावरून सिद्ध झाल्याचा युक्तिवाद सरकारतर्फे सहायक सरकारी वकील अॅड. प्रकाश जन्नू यांनी केला. एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले.
त्यानंतर न्यायालयाने एकूण ३ वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रकाश जन्नू तर आरोपीतर्फे अॅड. राहुल खंडाळ यांनी काम पाहिले. तपास पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे यांनी केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.