RTE Agrowon
ताज्या बातम्या

Right To Education : ‘आरटीई’अंतर्गत राज्यात पंचवीस हजार जागा रिक्त

Maharashtra Education System : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राज्यात आतापर्यंत ७६ हजार २०८ बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत.

Team Agrowon

Pune News : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राज्यात आतापर्यंत ७६ हजार २०८ बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून शाळा सुरू झालेल्या असताना अद्यापही २५ हजार ६३८ प्रवेशाच्या जागा रिक्तच पडल्या आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.

खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के प्रवेशाच्या जागा राखीव असतात. यातून वंचित व दुर्बल घटकांना मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येत असते. राज्यातील ८ हजार ८२३ शाळांमध्ये प्रवेशाच्या १ लाख १ हजार ८४६ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

या जागांसाठी ३ लाख ६४ हजार ४१३ बालकांची ऑनलाइन अर्ज नोंदणी झाली होती. लॉटरीद्वारे ९४ हजार ७०० बालकांची प्रवेशासाठी निवड यादी जाहीर करण्यात आली होती. यातील ६४ हजार २०६ बालकांचे प्रवेश शाळांमध्ये निश्चित झाले आहेत. प्रतीक्षा यादीत ८१ हजार १२९ विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता. यात पहिल्या टप्प्यात २५ हजार ८९२ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली.

आतापर्यंत १२ हजार ९१८ जागांवर प्रवेश

पुणे जिल्ह्यात ९३५ शाळांमध्ये १५ हजार ५९६ प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यासाठी ७७ हजार ५३१ बालकांची अर्ज नोंदणी झाली होती. लॉटरीद्वारे १५ हजार ५०१ बालकांना प्रवेश जाहीर झाले होते. यातील १० हजार ७४५ बालकांचे प्रवेश निश्चित झाले.

निवड यादीतील ४ हजार ४९४ बालकांना प्रवेशासाठी संधी देण्यात आली होती. त्यातील २ हजार १७३ प्रवेश झाले आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण १२ हजार ९१८ जागांवर प्रवेश झाले असून २ हजार ६७८ प्रवेशाच्या जागा रिक्तच आहेत. त्यामुळे अर्ज केलेल्यामधून थेट प्रवेश द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे.

आरटीई अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. तरीही काही जागांवर प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे त्या जागा रिक्त राहणार असून त्या जागेवर कोणालाही प्रवेश देता येणार नाही.
- डॉ. शरद गोसावी, उपसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT