Turmeric
Turmeric Agrowon
ताज्या बातम्या

Fraud: हळद व्‍यापाऱ्याकडून ११ शेतकऱ्यांना ३१ लाखांचा गंडा

ॲग्रोवन वृत्तसेवा

सातारा : खरेदी केलेल्‍या हळदीचे (Turmeric) पैसे न देता सातारा तालुक्‍यातील विविध गावांतील ११ शेतकऱ्यांची ३१ लाखांची फसवणूक केल्‍याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात एकावर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. राजकुमार रमेशचंद्र सारडा (रा. दौलतनगर, करंजे, मूळ रा. महावीरनगर, सांगली) असे संशयित व्यापाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मर्ढे (ता. सातारा) येथे विजय तुकाराम शिंगटे हे राहण्‍यास असून त्‍यांची शेती आहे. २०१८ मध्‍ये मर्ढे, वडूथ, मालगाव परिसरात त्‍यांची राजकुमार सारडा याच्‍याशी ओळख झाली. मी हळदीचा व्‍यापारी (Turmeric Trader) असून, त्याने शिंगटे व इतरांना सांगितले.

यानुसार शिंगटे यांनी हळद सारडाला दिली. या हळदीची वजने, पावत्‍या लिहून झाल्‍यानंतर तिची किंमत ८ लाख ५३ हजार इतकी झाली. हळदीची रक्कम येणे असतानाच शिंगटे यांनी सारडा याला पुन्‍हा २ लाख दिले.

दरम्‍यान, मर्ढे येथील मनजित काटकर व विकास जाधव आणि इतर सात तसेच वडूथ येथील तीन शेतकऱ्यांनी देखील आपली हळद सारडा याला दिली. हळद खरेदीपोटी सारडाकडून शेतकऱ्यांना प्रत्‍येकी दीड ते साडेतीन लाख रुपये येणे बाकी होते.

खरेदी केलेली हळद (Turmeric) नंतर सारडा याने साताऱ्यातील एका ट्रकमधून इतरत्र हलवली. विजय शिंगटे व इतर शेतकऱ्यांनी पैशांसाठी पाठपुरावा सुरु केला. यावेळी सारडाने त्‍यांना धनादेश दिले, मात्र ते खात्‍यात पैसे नसल्‍याने वटले नाहीत.

त्यांनतर सारडा याने उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले. फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच शिंगटे यांनी शुक्रवारी सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात तक्रार नोंदवली. यानुसार सारडावर फसवणुकीचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक एस. जी. जाधव करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Precautions : मॉन्सूनपूर्व सर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत

Agriculture Fertilizer : खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

Illegal Seeds : सीमावर्ती भागात बेकायदा बियाणे गुणनियंत्रणच्या रडारवर

Pre-Kharif Review Meeting : गावनिहाय पीक उत्पादन आराखडे वेळेत तयार करावेत

Agriculture Cultivation : रत्नागिरीत लागवडीखालील क्षेत्र ४ हजार हेक्टरने घटले

SCROLL FOR NEXT