Orange Agrowon
ताज्या बातम्या

Orange Crop Management : बेलखेडा येथे संत्राफळ पीक, मृग बहर व्यवस्थापनावर प्रशिक्षण

सर्वप्रथम परिसरातील विविध बागांची पाहणी करून निरीक्षणे घेत नोंदी घेण्यात आल्या. यामध्ये सायला, मावा, कोळी या किडीचा व ग्रेसीस स्पॉट या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला.

Team Agrowon

Washim News : कृषी विज्ञान केंद्राच्या (Agricultural Science Center) पुढाकाराने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार, प्रसार व वापर होऊन मॉडेल गाव निर्माण करण्याच्या दृष्टीने मौजे बेलखेडा (ता. रिसोड) गावात मागील तीन वर्षांपासून गटशेती उपक्रम राबविण्यात येत आहे.

या अनुषंगाने बेलखेडा येथे शिवारफेरी व संत्रा फळ (Orange Crop) काढणीपश्चात मृग बहार व्यवस्थापन विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले.

बेलखेडा, आसेगाव, रिठद व इतर गावांतील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्यातज्ज्ञ तथा संत्रा गट शेतीचे प्रवर्तक निवृत्ती पाटील हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

सर्वप्रथम परिसरातील विविध बागांची पाहणी करून निरीक्षणे घेत नोंदी घेण्यात आल्या. यामध्ये सायला, मावा, कोळी या किडीचा व ग्रेसीस स्पॉट या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला.

तसेच बऱ्याच बागांमध्ये आंबिया बहाराची फुले निघण्यास सुरुवात झाली असल्याचे दिसून आले.

तांत्रिक सत्रात निवृत्ती पाटील यांनी वरील सर्व किडी व रोगांचे नियंत्रण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

नको असलेली आंबिया बहाराची फूल गळ करण्यासाठी उपाययोजना सविस्तर सांगितल्या.

येत्या हंगामात मृग बहार नियोजनाच्या दृष्टीने ओलित व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, ताणाचे नियोजन इत्यादी संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश देव्हळे यांनी केले. आभार कृषी सहायक ए. जी. इंगोले यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT