Paddy harvesting  Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Harvesting : ओटवणेत रंगला पारंपरिक नव कापणी सोहळा

Kharif Season : शेतीची भरभराट होवो, बळीराजाला फळ मिळो, अशी प्रार्थना करीत जिल्ह्यातील ओटवणे (ता. सावंतवाडी) येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक नव कापणी सोहळा गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर साजरा केला.

Team Agrowon

Sindhudurg News : शेतीची भरभराट होवो, बळीराजाला फळ मिळो, अशी प्रार्थना करीत जिल्ह्यातील ओटवणे (ता. सावंतवाडी) येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक नव कापणी सोहळा गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर साजरा केला. ही पंरपरा पावणेपाचशे वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते.

शेतीची भरभराट होवो आणि बळीराजाला सुगीचे दिवस येवोत यासाठी या गावातील शेतकरी भातपिकांच्या रोपांची पुजा करतात आणि भाताला आलेल्या काही लोंब्याची तोरणे करून ती घरोघरी बांधली जातात. या सोहळ्याला नव कापणी सोहळा असे म्हटले जाते.

साधारणपणे गणेश चतुर्थीच्या दिवशी हा सोहळा होतो. काही धार्मिक अडचण आल्यास दसऱ्याला हा सोहळा साजरा केला जातो. पावणे पाचशे वर्षांपासून सोहळ्याची ही परंपरा सुरू असल्याचे सांगितले जाते. दरम्यान यावर्षी गणेश चतुर्थी दिवशी ओटवणे गावातील शेकडो ग्रामस्थ एकत्र आले.

त्यांनी रूढी परंपरेनुसार मंत्रघोष करीत ढोल-ताशांच्या गजरात या नव कापणी सोहळ्याला सुरुवात केली. सर्व ग्रामस्थ निश्चित केलेल्या ठिकाणी एकत्र आले. तेथून वाजतगाजत नव कापणीच्या ठिकाणी तेथे गेले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने भातरोपांची पुजा करण्यात आली. गणेशोत्सवात हा उत्सव असल्यामुळे मोठ्या संख्येने चाकरमानी या सोहळ्याला उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT