Tomato Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Market : पन्नास रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो खरेदी करावा

Tomato Price : निफाड तालुक्याचे नगदी पीक टोमॅटो आहे. कांद्याचे बाजारभाव घसरल्यावर टोमॅटो आर्थिक आधार देईल, या आशेत असलेल्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर बाजारभावातील घसरणीने पाणी फेरले.

Team Agrowon

Nashik News : शासनाने नाफेडमार्फत ५० रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन निफाड प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिले.

निफाड तालुक्याचे नगदी पीक टोमॅटो आहे. कांद्याचे बाजारभाव घसरल्यावर टोमॅटो आर्थिक आधार देईल, या आशेत असलेल्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर बाजारभावातील घसरणीने पाणी फेरले.

टोमॅटोचे भाव प्रतिकिलो तीन ते चार रुपये घसरले आहेत. टोमॅटोचा उत्पादन खर्च प्रतिएकरी दीड ते पावणे दोन लाख इतका येत आहे. आजच्या बाजारभावानुसार प्रतिक्रेटस सरासरी १०० रुपये दर मिळत आहे. यात तोडणी आणि वाहतूक खर्च मिळविल्यास शेतकऱ्याच्या हातात दहा ते वीस रुपये शिल्लक राहत आहेत.

शेती मशागत, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन संच, रोपे खरेदी, लागवड, बांधणी खते, तणनाशके, पोषके, कीटनाशके यांचा खर्च मिळविल्यास शेतकऱ्यांच्या हातात एक रुपयाही शिल्लक राहत नाही. यामुळे टोमॅटो शेती तोट्याची ठरत असून, शेतकरी कर्जबाजारी होण्याची भीती व्यक्त होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील, निफाड तालुकाध्यक्ष गजानन घोटेकर, भाऊसाहेब तासकर, सागर गवळी, सोमनाथ तासकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या मागणीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी या वेळी दिला.

मागील काही महिन्यांपूर्वी शासनाने बाजारभावावर नियंत्रण मिळविण्यासासाठी ‘नाफेड’मार्फत टोमॅटो खरेदी करून ग्राहकांना कमी भावात उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे शासनाने ५० रुपये प्रतिकिलो भावाने खरेदी करून रस्त्यावर टोमॅटो फेकण्याची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
-संतोष गायकवाड, टोमॅटो उत्पादक शेतकरी, कोकणगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू, शेतकऱ्यांना मदत, सवलती मिळणार- कृषिमंत्री भरणे

Sindhudurg Eco Sensitive Zone: पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात सिंधुदुर्गातील १९८ गावांचा समावेश

Water Management: धरणनिहाय पाणीसाठ्याचे नियोजन करावे : जिल्हाधिकारी

Karnataka Drought Relief: कर्नाटकातील ५० लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, प्रत्येकी २,५०० रुपयांचे कृषी निविष्ठा अनुदान जाहीर

Rabi Season: यंदाच्या रब्बी हंगामासाठी महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT