Tomato Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Prices : मोठी बातमी! टोमॅटोचे भाव लवकरच नियंत्रणात येणार, केंद्राने उचलली ठोस पावले

sandeep Shirguppe

Tomato Rate : मागच्या दोन महिन्यात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होताना दिसून आली. बिपॉरजॉय चक्रीवादळामुळे राजस्थान, गुजरात या दोन राज्यांत होणाऱ्या उत्पादनावर परिणाम झाला. तर दक्षिणेतील अनेक राज्यात टोमॅटोच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याने अचानक टोमॅटोचे उत्पादन घटत गेले. यामुळे सध्या देशभरात टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला आहे. यावर आता अंकूश ठेवण्यासाठी सरकारने पाऊल उचलले आहे.

टोमॅटोचे भाव नियंत्रणासाठी केंद्र सरकार आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांमधून टोमॅटो खरेदी करणार आहे. याबाबतचे निर्देश नाफेड आणि एसीसीएफला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. १४ जुलैपासून दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून टोमॅटोचे अनुदानित किमतीत वितरण केले जाणार आहेत.

ग्राहक व्यवहार विभागाने (Customer Affairs Department) नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एसीसीएफ) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान हे टोमॅटो खरेदी करून ज्या भागात दर जास्त आहेत त्या भागात वितरण करण्यास सांगितले आहे.

याबाबत केंद्र सरकारकडून निवेदन काढले आहे. देशभरात टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरम्यान एकूण उत्पादनापैकी दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील राज्यांत सुमारे ६० टक्के टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. या राज्यात घेतलेल्या टोमॅटोच्या उत्पादनाचा उपयोग इतर राज्यात पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केला जातो.

देशात टोमॅटोचे उत्पादन हे हंगामावार अवलंबून असते. वेगवेगळ्या राज्यात टोमॅटोचे हंगाम ठरलेले असता. परंतु डिसेंबर ते फेब्रुवारी या ४ महिन्यात टोमॅटोचे उत्पादन घटते. परंतु जुलै महिन्यात पावसामुळे पिकाचे नुकसान झाले किंवा वाहतूक अडथळे निर्माण झाले तर किंमती वाढतात. टोमॅटो हंगामात व्यत्यय आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान झाल्यास अनेकदा भाव अचानक वाढतात.

गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातून सध्या टोमॅटोचा पुरवठा होत असल्याचे सरकारने म्हटले आहे.

दिल्ली आणि आसपासच्या शहरांना हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातून साठा मिळत आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून नवीन पिकांची आवक लवकरच अपेक्षित आहे.

यामुळे केंद्र सरकारने प्रमुख उपभोग केंद्रांना वितरणासाठी आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र येथून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश Nafed, NCCF ला दिले आहेत.

सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, शुक्रवारपासून दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून टोमॅटोचे अनुदानित किमतीत वितरण केले जाणार असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment : बांबूच्या वस्तू निर्मितीतून आदिवासी महिला झाल्या कुशल

Sharad Pawar : साखरपट्ट्यातील आणखी एक दिग्गज नेता शरद पवारांच्या साथीला; अजित पवार यांना धक्का

Book Review : जगण्याचा आदीम तळ धुंडाळणारी रिंगाण

Haryana Assembly Elections : हरियाणात भाजपची हॅट्रीक हुकणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेस वरचढ; राज्यात झाले ६७ टक्के मतदान

Rainfed Farming Policy : कोरडवाहू शेतीचे शाश्‍वत धोरण कधी?

SCROLL FOR NEXT