Tomato Grower Farmers : हाताशी आलेलं टोमॅटो पीक केलं उद्धवस्त, २५ लाखांचे नुकसान

sandeep Shirguppe

कोल्हापूर टोमॅटो उत्पादक शेतकरी

सध्या टोमॅटो, मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे.

Tomato Grower Farmers | agrowon

समाजकंटकांकडून नुकसान

परंतु काही समाजकंटकांनी शेतकरी दिनकर चव्हाण यांच्या शेतातील तोडणीसाठी आलेल्या टोमॅटो, कारले व मिरची तसेच संजय खोत यांच्या शेतातील वरणा पीक उद्धवस्त केले आहे.

Tomato Grower Farmers | agrowon

शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

दिनकर चव्हाण यांचे या सगळ्यात तब्बल ३० लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे शेतकरी दिनकर चव्हाण यांना अश्रू अनावर झाले होते.

Tomato Grower Farmers | agrowon

जवळपास ३० लाखांचे नुकसान

यावेळी चव्हाण कुटुंबियांशी चर्चा केली असता आम्ही काबाड कष्ट करून दिड एकरमध्ये २० गुंठे टोमॅटो, २० गुंठे मिरची तर २० गुंठ्यात कारल्याचे पीक घेतले होते. यामध्ये अंदाजे त्यांना ३० लाखांचा नफा अपेक्षीत होता.

Tomato Grower Farmers | agrowon

रोपे जगवण्यासाठी धडपड

अशातच लांबलेला पाऊस, पाण्याची कमतरतेमुळे चव्हाण कुटुंबीयांनी रोपे जगवण्यासाठी भांड्यातून पाणी घालून हे पिक वाढवले होते.

Tomato Grower Farmers | agrowon

शेती हाच मुख्य व्यवसाय

चव्हाण यांचे सुमारे १५ जणांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. तर संजय खोत यांचाही संसार शेतीवर अवलंबून आहे. मात्र या शेतकऱ्यानी जीवापाड जपलेले हे पीक रात्री समाजकंटकांनी उपटून टाकून त्याची नासधूस केली.

Tomato Grower Farmers | agrowon

घराचे बांधकाम अर्धवटच

दरम्यान या शेतीच्या आधारावर चव्हाण यांनी घराचे बांधकाम काढले होते अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या शेतीत विविध पीके घेत आर्थिक उत्पन्न वाढणव्याचा प्रयत्न होता.

Tomato Grower Farmers | agrowon

पोलिसांनी केले बेदखल

याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. परंतु पोलिसांनी समाधानकारक तपास न केल्याने चव्हाण कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली.

Tomato Grower Farmers | agrowon

जिल्हा कृषीअधिकाऱ्यांवर संताप

याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात एवढी मोठी घटना घडलेली असूनही तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

Tomato Grower Farmers | agrowon

लोकप्रतिनीधींचा आधार

याबाबत माहिती मिळताच, आमदार ऋतुराज पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, यांनी ही घटनास्थळावर येत पाहणी केली.

Tomato Grower Farmers | agrowon