Tomato Market  Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Market : टोमॅटो उत्पादक शेतकरी काढणार मंत्रालयावर मोर्चा

Tomato Market Update : टोमॅटो महाग झाल्यानंतर केंद्र शासनाने हस्तक्षेप करून टोमॅटो आयात केली. कांद्यावर निर्यात शुल्क लागू केले.

Team Agrowon

Pune News : टोमॅटो महाग झाल्यानंतर केंद्र शासनाने हस्तक्षेप करून टोमॅटो आयात केली. कांद्यावर निर्यात शुल्क लागू केले. टोमॅटो खरेदी करून ग्राहकांना अल्प दरात उपलब्ध करून दिले. आता टोमॅटोचे भाव मातिमोल झाले आहेत.

या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने किमान पंचवीस रुपये प्रति किलो या दराने टोमॅटो खरेदी करावीत. अन्यथा मुंबई येथे मंत्रालयावर टोमॅटो मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम व शिवसेनेचे तालुकाप्रमुख( ठाकरे गट) माऊली खंडागळे यांनी दिला आहे.

शेतकरी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी सोमवारी (ता.१८) नारायणगाव येथील टोमॅटो बाजारात माजी सभापती देवदत्त निकम, तालुकाप्रमुख खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना व शेतकरी यांची बैठक घेण्यात आली.

यावेळी मंत्रालयावर टोमॅटो मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीला शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे, सचिन थोरवे, संदेश खंडागळे, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ वाळुंज, बाजार समितीचे संचालक सारंग घोलप आदी मान्यवर टोमॅटो उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

देवदत्त निकम म्हणाले, की शेतकरी हितासाठी व विकासासाठी मंत्रिमंडळात सहभागी झालो असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील देत आहेत. त्यांचे व पंतप्रधानांशी चांगले संबंध आहेत. यामुळे सहकार मंत्री वळसे पाटील, आमदार अतुल बेनके यांनी पंतप्रधान व केंद्रीय कृषिमंत्री यांची भेट घेऊन कांदा उत्पादक व टोमॅटो उत्पादकांचे प्रश्न सोडवावेत.

निकम पुढे म्हणाले, की केंद्रात व राज्यात घोषणा करणारे व शेतकरी विरोधी सरकार आहे. जुन्नर व मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची कांदा अनुदानाची सुमारे १९ कोटी रुपयांची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. नाफेडमार्फत चोवीस रुपये दहा पैसे दराने कांदा खरेदी करण्याची घोषणा केली. मात्र अद्याप कांदा खरेदी सुरू केली नाही.

टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर शासनाने टोमॅटो खरेदी केली. मात्र भाव कमी झाल्यानंतर कोणती उपाययोजना केली जात नाही. शासनाने टोमॅटो उत्पादकांना अनुदान द्यावे. २५ रुपये प्रति किलो या दाराने टोमॅटो खरेदी करावीत. अन्यथा मुंबई येथे मंत्रालयावर टोमॅटो मोर्चा काढण्यात येईल.

खंडागळे म्हणाले, की शेतकऱ्यांना भीक नको. त्यांना त्यांच्या घामाचे मोल मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम मंत्री करत आहेत.

राज्याचे कृषिमंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो नारायणगाव येथे विक्रीसाठी घेऊन येण्याची वेळ आली आहे. भांडवली खर्च विचारात घेता टोमॅटो क्रेटला किमान ४०० ते ५०० रुपये भाव मिळणे आवश्यक आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे खांडगे, वाळुंज, थोरवे यांनी मनोगत व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Import : अफगाणिस्तानातून लसणाची आयात

Sharad Pawar : ईव्हीएम, पैशाने आमचा घात केला

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

SCROLL FOR NEXT