Tomato Market : निफाडला महामार्गावर टोमॅटो फेकला; ‘स्वाभिमानी’ आक्रमक

Tomato Market Update : गेल्या तीन-चार दिवसांपासून टोमॅटोला अवघा २ ते ३ रुपयांचा किलोला दर मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्च निघणे ही दुरापास्त झालेले असताना शेतकऱ्यांचा संतापाचे वातावरण आहे.
Tomato Rate
Tomato RateAgrowon

Nashik News : गेल्या तीन-चार दिवसांपासून टोमॅटोला अवघा २ ते ३ रुपयांचा किलोला दर मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्च निघणे ही दुरापास्त झालेले असताना शेतकऱ्यांचा संतापाचे वातावरण आहे.

याच पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. १६) निफाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर टोमॅटो फेकत आक्रोश व्यक्त केला. या वेळी मागण्यांची निवेदन निफाडचे पोलिस निरीक्षक महाजन यांना देण्यात आले.

संपूर्ण जिल्हाभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो कवडीमोल दराने विकला जात आहे. उत्पादन खर्चच फिटत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे, अशा परिस्थितीत शासनाने नाफेडमार्फत टोमॅटोची खरेदी करावी,

Tomato Rate
Tomato Rate : सरकारची आडमुठी भूमिका शेतकरी आला मेटाकुटीला, दोन एकर टोमॅटो टाकला उपटून

टोमॅटोला ५० रुपये किलोचा दर द्यावा तसेच शासनाने व केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा विचार करत टोमॅटोला २५ रुपये प्रतिकिलो अनुदान द्यावे, यासह अन्य मागण्यासाठी सकाळी ११ वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवृत्ती गारे यांच्या नेतृत्वाखाली निफाडला छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शांतीनगर चौफुलीवर टोमॅटो फेकत आंदोलन केले.

Tomato Rate
Tomato Rate : ९०० किलो टोमॅटोला मिळाले फक्त ३४ रुपये, ट्रॅक्टर घेण्याच्या स्वप्नाचा चुराडा

या वेळी केंद्र शासन व राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी शासनाच्या चुकीचा धोरणांचा निषेध करण्यात आला. त्यानंतर मागण्यांची निवेदन निफाड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. महाजन यांना देण्यात आले.

या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे, तालुका अध्यक्ष गजानन घोटेकर, सरचिटणीस सागर गवळी, मनसेचे अब्दुल शेख, दत्तात्रय सुडके, युवा क्रांती शेतकरी संघटनेचे संजय पाटोळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे सागर निकाळे, सुनील कापसे, साहेबराव शिंदे, रामदास तासकर, योगेश पोटे, ज्ञानेश्‍वर तासकर, मच्छिंद्र रोटे, सुनील घोटेकर, योगेश घोटेकर, दीपक घोटेकर, धीरज तासकर आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी कांदा उत्पादक शेतकरी या वेळेला उपस्थित होते.

शासनाने नाफेडमार्फत टोमॅटोची खरेदी करावी. टोमॅटोला पन्नास रुपये किलोचा दर द्यावा, टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत असताना त्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसावे. कांदा व इतर पिकांवर शासनाचे निर्बंध लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने त्याच्या प्रश्‍नाकडे न्याय द्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल.
-निवृत्ती गारे, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com