Rabbi Crop Competition Agrowon
ताज्या बातम्या

Rabbi Crop Competition : रब्बी पीक स्‍पर्धेत सहभागी व्हावे

प्रयोगशील शेतकऱ्यांना संधी; कृषी विभागातर्फे आवाहन

Team Agrowon

परभणी : राज्यात प्रयोगशील शेतकऱ्यांकडून विविध पिकांच्या माध्यमातून उत्पादन वाढविले जाते. त्यातून त्यांचा आर्थिक स्तर उंचावतो. अशा शेतकऱ्यांकडून इतरांनी प्रेरणा घेत आर्थिक प्रगती साधावी. यासाठी रब्बी हंगामातील (Rabbi Season) ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस पीक उत्पादक शेतकऱ्यांच्या जिल्हा आणि तालुकास्तरीय पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आहे.

विविध प्रयोगातून आर्थिक प्रगती साधणाऱ्या शेतकऱ्यांचे इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे आणि रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाच्या माध्यमातून कृषी उत्पादनामध्ये भर पडावी हा उद्देश ठेवून राज्याअंतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस आदी पाच पिके असून पीकस्पर्धेतील पिकाची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान एक हजार हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र त्यापेक्षा कमी असल्यास मात्र स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहीत मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

पीकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीकडे स्वतःच्या शेतात भात पिकासाठी किमान २० आर आणि इतर पिकासाठी ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम ३०० रुपये राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान १० आणि आदिवासी गटासाठी किमान पाच अर्ज असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा प्रवेश अर्ज कमी आल्यास पीकस्पर्धा रद्द करून प्रवेश शुल्क परत देण्यात येईल.

ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस पिकाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्या दिवशी शासकीय सुट्टी असल्‍यास त्‍यापुढील तारीख गृहीत धरण्‍यात येईल. जिल्हा स्तरावरील विजेत्याला अनुक्रमे पहिले दहा, दुसरे सात आणि तिसरे पाच हजाराचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर तालुकास्तरावर पहिले पाच, दुसरे तीन आणि तिसरे बक्षिस दोन हजार रुपयांचे मिळणार आहे. या पद्धतीने पीकस्पर्धा घ्यावयाचे हे प्रथम वर्ष असल्याने प्रथम फक्त तालुकास्तरीय व जिल्‍हास्‍तरीय पीकस्पर्धा घेणार आहे. मागील वर्षाच्‍या तालुकास्‍तरीय स्‍पर्धेतील पीकनिहाय पहिल्‍या तीन क्रमांकाच्‍या विजेत्‍या शेतकऱ्यांनी जिल्‍हास्‍तरीय पीक स्‍पर्धेमध्‍ये सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT