Crop Dmage
Crop Dmage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी काढणीपश्चात तंत्रज्ञानावर लक्ष द्या

टीम ॲग्रोवन

सोलापूर : फळे वा भाज्यांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन (Quality Production of Vegetables and fruit) महत्त्वाचे आहेच, पण काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा (Agricultural Technology) योग्य वापर होत नसल्याने वर्षाकाठी सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक शेतमालाचे नुकसान (Crop Damage) होते, हे नुकसान टाळण्यासाठी काढणीपश्चात तंत्रज्ञानावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक आणि मॅग्नेट प्रकल्पाचे संचालक दीपक शिंदे (Deepak Shinde) यांनी रविवारी (ता. २५) व्यक्त केले.

सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त डाळिंबबाग व्यवस्थापनाच्या उत्कृष्ट पद्धती यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. शिंदे बोलत होते. पुण्यातील पुष्प विज्ञान संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, राज्य डाळिंब संघाचे माजी अध्यक्ष शहाजीराव जाचक, संघाचे उपाध्यक्ष प्रतापराव काटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, डाळिंब केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे यावेळी व्यासपीठावर होते.

श्री. शिंदे म्हणाले, फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी मॅग्नेट प्रकल्प फायदेशीर आहे. या प्रकल्पासाठी ११०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. डाळिंब, द्राक्ष, चिक्कू, पेरुसह दहा फळांचा त्यात समावेश आहे. त्यातून सुमारे ६० टक्क्यांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. शिवाय निव्वळ ४०० कोटी रुपये खेळते भांडवल म्हणून ठेवण्यात आले आहेत.

वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांना उत्पादनात अडचणी आहेत, नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतो आहे. पण या अडचणी-संकटातूनच आपल्याला संधी मिळत असते, शेतकऱ्यांनी त्याचा विचार करावा, असेही ते म्हणाले.

श्री. प्रसाद म्हणाले, की आपल्या संस्कृतीमध्ये फळा-फुलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशभरात फुलांचे उत्पादन जवळपास तीन लाख हेक्टरवर घेतले जाते. फळे किंवा फुलांचे उत्पादन हे व्यापारी तत्त्वावर घेतले पाहिजे. तरच त्यातून जादाचे पैसे मिळतील. डाळिंबाने सोलापूरसह कोरडवाहू शेतीला दिशा दिली आहे. औषधी गुणधर्म असणारे डाळिंब बहुउपयोगी आहे. कोरोना काळात त्याचे महत्त्व समजले आहे.

शेतकऱ्यांनी त्यातील समस्या शास्त्रज्ञांशी संवाद साधून सोडवाव्यात, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात केंद्रसंचालक डॉ. मराठे यांनी संशोधन केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतला. संशोधन केंद्राच्या शिफारशींवर आधारित उत्कृष्ट व्यवस्थानातील डाळिंबाचे प्लॅाट आम्ही शेतकऱ्यांना दाखवू, शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद आणखी वाढवू, असे आश्वासन दिले. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निलेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्सना शर्मा यांनी आभार मानले.

रिझल्टचे प्रात्यक्षिक प्लॅाट दाखवा

यावेळी श्री. चांदणे यांनी संशोधन केंद्राच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली ते म्हणाले, संशोधन केंद्राच्या एवढ्या वर्षानंतरही तेलकट डाग, मर, पिनहोल बोरर यासारख्या कीड-रोगावरील उपाय मिळालेला नाही, आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत. पण ठोस काहीच मिळत नाही. आतापर्यंत केंद्राने सोलापूर लाल आणि सोलापूर अनारदाणा ही दोन वाणे संशोधित केली.

पण त्याची साईज कमी आहे. त्याचा मार्केटसाठी उपयोग होत नाही. कीड-रोगावरील उपायांबाबत संशोधन केंद्राने पेटंट मिळवल्याचं सांगितलं जातं. पण मूळात आम्हाला त्याची प्रात्यक्षिकं दाखवा, केवळ आश्वासने नको, व्यावसायिक पद्धतीने एखाद्या प्लॅाटवर त्याची प्रात्यक्षिके घेऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचे रिझल्ट दाखवा, असेही ते म्हणाले.

डाळिंबावर तांत्रिक सत्रे

मुख्य उद्‌घाटन सत्रानंतर दुपारी तांत्रिक सत्रांमध्ये डाळिंबातील दर्जेदार रोपांचे उत्पादन याविषयावर डॉ. एन. व्ही. सिंह, डाळिंबातील रोग व्यवस्थापनावर डॉ. ज्योत्सना शर्मा, डाळिंबातील सूत्रकृमी व्यवस्थापनावर डॉ. सोमनाथ पोखरे, डाळिंबातील विविध किडींचे व्यवस्थापन या विषयावर डॉ. मल्लिकार्जुन, डाळिंबाचे काढणीपश्चात व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन यावर डॉ. निलेश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT