Raigad News : पावसाने आंबा, काजू पिकावर विपरीत परिणाम झाला होता. त्यानंतर मेमध्ये पडलेल्या पावसाने बाजारात आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले, मात्र नुकसानीच्या बदल्यात बागायतदारांनी विम्यातील एक रुपयाचाही परतावा मिळाला नसल्याने आर्थिक संकटात आहेत. .रायगड जिल्ह्यातील आंबा बागांचे नुकसान होण्याची अनेक कारणे आहेत. निसर्ग चक्रीवादळापासून जिल्ह्यात फळपीक विमा काढण्याचे प्रमाण वाढले होते. गेल्या वर्षी ५,२४४ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता. या परताव्याची रक्कम काही कोटींच्या घरात आहे, पण हा परतावा कधी मिळेल, याची श्वाश्वती अजूनही आंबा बागायतदारांना नाही. .आंबा पिकासाठी प्रति हेक्टरी १४ हजार ४५० रुपये हप्ता भरला होता, तर काजू पिकासाठी दोन हजार रुपये विम्यासाठी हप्ता भरला होता, पण येणाऱ्या हंगामासाठी तितकाच हप्ता ऑनलाइन भरावा लागणार आहे..Mango Crop Damage : आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत.नुकसानीचे पंचनामे वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आलेले आहेत. पुढील काही दिवसांत विम्याचा परतावा मिळू शकेल, असा आशावाद फळपीक विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक कार्तिक नागरे यांनी दिली..नुकसानीची प्रमुख कारणेसततचा पाऊस ः डिसेंबर, जानेवारीत मोहोर येण्याच्या किंवा फळधारणा होण्याच्या वेळी अवकाळी पावसाने आंब्याचा मोहोर गळतो किंवा लहान फळे (कैऱ्या)गळून पडले. यामुळे उत्पादनात मोठी घट होती. त्याचबरोबर मेमध्ये पडलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला पीक वाया गेले होते..Mango Crop Damage : पावसाळी वातावरणामुळे आंब्याच्या विक्रीवर परिणाम.बदलते तापमान ः सातत्याने पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण, दिवस आणि रात्रीच्या तापमानातील आर्द्रतेत सतत होणाऱ्या चढ-उतारामुळे फळगळती मोठ्या प्रमाणात झाली होती. चांगला मोहोर येण्यासाठी आवश्यक थंडी पडली नसल्याने मोहोर कमी झाला होता.रोगांचा प्रादुर्भाव : तुडतुडे, फुलकिड्यांमुळे फळांवर काळे डाग पडण्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. या सर्व कारणांमुळे रायगडमध्ये आंब्याचे उत्पादन अपेक्षेपेक्षा ५० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याची नोंद आहे..दर्जावर परिणाम : कीड, रोग तसेच अनियमित हवामानामुळे फळांच्या गुणवत्तेवर (दर्जावर) परिणाम होतो. ज्यामुळे निर्यातीवरही परिणाम होतो. या नुकसानीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी फवारणी, खत नियोजन करतात. तसेच शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी करतात. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.