Gokul Dudh Dar : डिबेंचर कपातीला दूध संस्था आणि दूध उत्पादकांकडून जोरदार विरोध सुरु असतानाच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दिवाळीत दूध उत्पादकांना खुश करण्यासाठी शुक्रवारी (दि.१७) महत्त्वाचे निर्णय घेतले. 'गोकुळ'ने कोल्हापूर जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील गाय आणि म्हैशीच्या दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर १ रुपयाची वाढ केली आहे. यामुळे म्हैस दूध दर प्रतिलिटर ५१.५० रुपयांवरून ५२.५० रुपये आणि गाय दूध दर ३३ रुपयांवरून ३४ रुपये करण्यात आला आहे. २१ ऑक्टोबरपासून हे खरेदी दर लागू होतील. या निर्णयाचा साडेचार लाख दूध उत्पादकांना फायदा होणार आहे..तसेच ‘महालक्ष्मी गोल्ड’ आणि ‘कोहिनूर डायमंड’ या पशुखाद्यांच्या मूळ विक्री दरात ५० किलोच्या पोत्यावर ५० रुपये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. .Gokul Dudh Utpadak Morcha: 'गोकुळ'वर धडकला दूध उत्पादकांचा जनावरांसह मोर्चा, डिबेंचर कपातीवरुन मुश्रीफ विरुद्ध महाडिक संघर्ष वाढला.मार्च २०२६ अखेरपर्यंत या योजनेतून दूध उत्पादकांना ५.५ कोटींचा लाभ मिळेल. तसेच संस्था व्यवस्थापन खर्च ९० पैशांऐवजी १ रुपये (१० पैशांची वाढ) करण्यात आला आहे. यामुळे ६ कोटींचा वार्षिक भार संघावर पडेल. याचसोबत गाभण जनावरांसाठी नवीन ‘महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन’ बाजारात आणण्यात आले आहे. यामुळे प्रसूती सुलभ होते. रेडके/वासरे निरोगी जन्माला येतात आणि दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार असल्याने 'गोकुळ'ने म्हटले आहे. .Gokul Politics: 'शेतकरी संवेदनशील, पण १२ दिवसांत एकही बैठक नाही...'; 'गोकुळ'च्या डिबेंचर कपातीवरुन शौमिका महाडिकांचा हल्लाबोल.'गोकुळ' संघाने दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे म्हणून दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात म्हैस दूध खरेदी ६.० फॅट आणि ९.० एस. एन.एफ करिता प्रतिलिटर ५१.५० रुपयांवरून ५२.५० रुपये दराने करण्यात येईल. तर गाय दूध खरेदी ३.५ फॅट आणि ८.५ एस. एन. एफ करिता प्रतिलिटर ३३ रुपयांवरून ३४ रुपये दराने करण्यात येईल, असे 'गोकुळ'ने म्हटले आहे..दूध विक्री दरात वाढ नाहीया दरवाढीमुळे म्हैस आणि गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना महिन्याकाठी सुमारे साडेचार ते पाच कोटी अधिक रक्कम मिळेल. दरम्यान, गोकुळ दूध विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याचे संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. .गोकुळ दूध संघासाठी कोल्हापूर जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील ७ हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून दररोज सुमारे १६ लाख लिटर दूध संकलन केले जाते. दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी आणि दूध व्यवसाय वाढीसाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे 'गोकुळ'चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी म्हटले आहे..दरम्यान, आज संघाच्या वतीने पारंपरिक वसुबारस पूजन करण्यात आले. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील, आमदार जयंत आसगावकर, केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष आण ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक मंडळ, संघाचे अधिकारी आणि महिला दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होत्या..यानंतर ‘गोकुळ चीज’ आणि ‘गोकुळ गुलाबजामून’ या नवीन दुग्धजन्य पदार्थांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ‘गोकुळ आईस्क्रीम’ लवकरच बाजारात येणार असल्याचे संचालक मंडळाने जाहीर केले. .डिबेंचर कपात रक्कम परत करण्याबाबत निर्णय नाहीदूध संघाच्या डिबेंचर कपातीचा मुद्दा सध्या गाजत आहे. गुरुवारी (दि. १६) दूध संस्था आणि दूध उत्पादकांनी गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता. डिबेंचर कपातीची रक्कम दूध संस्थांना परत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात 'गोकुळ'च्या संचालिका शौमिका महाडिक सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, याबाबत 'गोकुळ'ने कोणताही निर्णय घेतलेला नाही. ''डिबेंचर कपातीचा निर्णय काही नवीन नाही. ३२ वर्षापूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीच डिबेंचर कपातीचा निर्णय घेतला होता. दूध संस्थांना बळकटी मिळावी म्हणून हा निर्णय घेतला होता. तो आजही कायम आहे, असे 'गोकुळ'चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. गोकुळ अध्यक्षांना विचारुन दूध उत्पादकांची दिवाळी गोड करण्याबाबत काही ना काही निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही डोंगळे यांनी दिली होती. त्यानुसार, संघाने म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात वाढ केली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.