Wet Drought Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : ‘राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ’

राज्यातून बाहेर जाणारे प्रकल्प रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री गणपतीत २५० मंडळे फिरले, आता पुन्हा त्यांना दांडिया, गरबासाठी सगळीकडे फिरायचे असेल.

टीम ॲग्रोवन

रत्नागिरी : ‘‘राज्यातून बाहेर जाणारे प्रकल्प रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री गणपतीत २५० मंडळे फिरले, आता पुन्हा त्यांना दांडिया, गरबासाठी सगळीकडे फिरायचे असेल. मात्र त्याआधी त्यांनी राज्यातील प्रकल्पांकडे, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष (Farmer Issue) द्यावे. राज्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची वेळ आली आहे,’’ असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी रत्नागिरीतील संवाद निष्ठा यात्रेप्रसंगी केले.

रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळील मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, माजी खासदार अनंत गिते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ‘‘राज्याच्या उद्योगमंत्र्यांना वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पाबाबत काहीही माहिती नसणे हे धक्कादायक गोष्ट आहे. रायगडमध्ये येऊ घातलेला बल्क ड्रग्ज प्रकल्पही राज्याबाहेर गेला. त्यामुळे ८० हजार तरुणांचा रोजगार गेला. त्याचीही माहिती उद्योगमंत्र्यांना नव्हती. शिंदे सरकारमध्ये गेलेले मंत्री हिंदुत्वासाठी नव्हे तर खोक्यांसाठी गेले.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Subsidy : कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ३० हजार, बागायतीसाठी ७० हजार रुपये अनुदान द्या

Farmer Crisis : करपलेल्या ४० एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

Monsoon Forecast : पावसाचे अंदाज चुकले का? Weather Model आणि Synoptic Features मधला फरक समजून घ्या

Rural Power Supply Issue: महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या; सोमवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ‘टाळे ठोको’चा इशारा

SCROLL FOR NEXT