Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Competition : गुणवत्तेला चालना देण्यासाठी ‘तिफन’ स्पर्धा उपयुक्त

Agriculture News : महात्मा फुले कृषी विद्यापीठ व सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स, इंडियातर्फे राष्ट्रीय पातळीवरील ‘तंत्रज्ञान तिफण-२०२३’ या कृषियंत्रे विकसित करण्याच्या स्पर्धेचे विद्यापीठात आयोजन केले आहे.

Team Agrowon

Nagar News : ‘‘विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना दिल्यास त्यामधून चांगले आविष्कार घडतात. त्यातूनच उद्याचे संशोधक निर्माण होतात. या विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीला वाव देवून त्यातून नवनिर्मिती होण्यासाठी तिफन स्पर्धा उपयुक्त आहे,’’ असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी केले. देशभरातून १५ महाविद्यालयीन संघाची या स्पर्धेच्याअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ व सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स, इंडियातर्फे राष्ट्रीय पातळीवरील ‘तंत्रज्ञान तिफण-२०२३’ या कृषियंत्रे विकसित करण्याच्या स्पर्धेचे विद्यापीठात आयोजन केले आहे. त्यास शनिवारी (ता.३) सुरवात झाली.

कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे डॉ. गोरंटीवार याच्या हस्ते उद्घाटन झाले. डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, आंतरविद्या जलसिंचन शाखेचे विभाग प्रमख डॉ. महानंद माने, कृषियंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, कृषियंत्रे व अवजारे प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड आदी उपस्थित होते.

या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून या स्पर्धेचा विषय ट्रॅक्टरचलित किंवा स्वयंचलित भाजीपाला पूर्नलागवड यंत्रे हा आहे. या स्पर्धेसाठी देशातील एकूण ५२ अभियांत्रिकी महाविद्यालयातून १५ महाविद्यालयांच्या संघांची अंतिम फेरीमध्ये निवड झालेली आहे.

यामध्ये पंजाब राज्यातील दोन संघ, तमिळनाडू व हरियानामधील प्रत्येकी एक संघ व महाराष्ट्रातून ११ संघ असे एकूण १५ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा आज (ता. ४) समारोप होईल. या अंतिम १५ संघानी बनविलेल्या भाजीपाला पुनर्लागवड यंत्रांचे पाच वेगवेगळ्या विभागात चाचण्या होतील. त्यानंतर प्रत्यक्ष शेतावर देखील या यंत्रांची परिक्षा घेतली जाईल, असे डॉ. सचिन नलावडे यांनी सांगितले.

या अंतिम फेरीत १५ संघांतील स्पर्धेसाठी एकूण ३१५ विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि २५ पेक्षा जास्त मार्गदर्शक सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कृषी यंत्रांची गुणवत्ता तपासण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील २६ पंचांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection : नांदेड जिल्ह्यात आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Dam Water Levels : लघू प्रकल्पात १२, मध्यम प्रकल्पात १४ टक्के पाणीसाठा

Road Protest : सासुरे-कौठाळी रस्त्यासाठी ‘रास्ता रोको’

Water Scarcity : पाणीटंचाई टाळण्यासाठी वर्षभराचे नियोजन करा; पालकमंत्री जयकुमार गोरे

Goat Farming : शास्त्रीय व्यवस्थापनातून शेळीपालनात शाश्वत उत्पन्न

SCROLL FOR NEXT