Bharat Jodo Yatra  Agrowon
ताज्या बातम्या

Bharat Jodo Yatra : भारत जोडो’ द्वारे शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना हात

भारत जोडो’ यात्रेबद्दल सामान्य जनतेमध्ये उत्सुकता, कुतूहल आहे. राहुल गांधी यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे दिसते. महागाई, रोजगार, शेतकरी, कष्टकरी समाजाच्या प्रश्नांना पदयात्रेत हात घातला जात आहे.

Team Agrowon

कळमनुरी, जि. हिंगोली : ‘‘‘भारत जोडो’ यात्रेबद्दल (Bharat Jodo Yatra ) सामान्य जनतेमध्ये उत्सुकता, कुतूहल आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे दिसते. महागाई, (Inflation) रोजगार, शेतकरी, कष्टकरी समाजाच्या प्रश्नांना पदयात्रेत हात घातला जात आहे.

गांधी हे वंचित, पीडित, सामान्य जनतेच्या समस्या ऐकून घेत त्यांना आधार देत आहेत. ही पदयात्रा सर्वसामान्य जनतेच्या अंतःकरणाला भिडत आहे,’’ असे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी (ता. १२) कळमनुरी येथे व्यक्त केले.

‘‘आदित्य ठाकरे यांन पदयात्रेत सहभाग घेतल्याने त्यांच्यावर केली जात असलेली टीका अनावश्यक आहे. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी शिवसेना ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होत असेल तर स्वागतार्ह आहे,’’ असा टोला थोरात यांनी मारला.

दरम्यान, ‘भारत जोडो’ यात्रेत हिंगोली जिल्ह्यात शनिवारी (ता.१२) नांदेड -कळमनुरी-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर गांधी यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिकांनी गर्दी केली. नागरिकांची भेटीची ओढ पाहून गांधी यांनी त्यांना जवळ बोलावून आस्थेने चौकशी केली. त्यांनी विविध क्षेत्रातील नागरिकांशी चर्चा केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT