Soybean Theft Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Theft : खोडदला मळणी केलेल्या सोयाबीनवर चोरट्यांचा डल्ला

घटना शनिवारी (ता. १५) पहाटे खोडद (ता.जुन्नर) येथे घडली. या प्रकरणी शेतकरी प्रवीण विलास पानमंद यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

टीम ॲग्रोवन

नारायणगाव, ता. जुन्नर ः मळणी करून काढलेले एक टन सोयाबीन (Soybean Crop) घराच्या दरवाजाची दोन कुलपे तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. (Soybean theft) ही घटना शनिवारी (ता. १५) पहाटे खोडद (ता.जुन्नर) येथे घडली. या प्रकरणी शेतकरी प्रवीण विलास पानमंद (Praveen Vilas Panmand) यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात (Narayangaon Police Station) तक्रार दिली आहे.

प्रवीण पानमंद यांची खोडद येथील गारमाळ शिवारात शेती आहे. सात एकर क्षेत्रात त्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. सततच्या पावसामुळे सोयाबीनचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

पाऊस, मजूर टंचाई , रासायनिक खते, कीटकनाशकांचे वाढलेले भाव, बिबट्यांची भीती आदी अनेक संकटाचा सामना करीत उत्पादित केलेले सोयाबीन पीक काढण्यास पानमंद यांनी शनिवारी (ता.१५) सुरुवात केली.

दिवसभरात दीड एकर क्षेत्रातील सोयाबीनची मळणी करून सुमारे दीड टन सोयाबीन तयार झाले. पावसाचा धोका विचारात घेऊन सोयाबीनच्या गोणी शेतातील घरात ठेवल्या. शेतावर बिबट्यांची भीती असल्याने घराच्या दरवाजाला दोन कुलपे लावून पानमंद शुक्रवारी (ता. १४) रात्री गावातील घरी झोपण्यास गेले.

मात्र, शनिवारी सकाळी शेतातील शिल्लक सोयाबीन काढण्यासाठी शेतात गेले असता घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक टन सोयाबीन चोरून नेल्याचे दिसून आले. या बाबतची तक्रार प्रवीण पानमंद यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT