Soybean Agrowon
ताज्या बातम्या

Crop Demonstration : तीन हजारांवर शेतकऱ्यांची होणार पीक प्रात्यक्षिकांसाठी निवड

Kahrif Season : एका शेतकऱ्याला एक एकर याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ३०७५ शेतकऱ्यांची निवड येत्या हंगामातील पीक प्रात्यक्षिकांसाठी करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar : एका शेतकऱ्याला एक एकर याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ३०७५ शेतकऱ्यांची निवड येत्या हंगामातील पीक प्रात्यक्षिकांसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर पीक प्रात्यक्षिके या घटकासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी विश्‍वास जाधव यांनी केली.

श्री. जाधव म्हणाले, की आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त २०२३- २४ मध्ये पौष्टिक तृणधान्याचा प्रचार व प्रसार होण्याच्या उद्दिष्टाने बाजरी, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर पीक प्रात्यक्षिके छत्रपती संभाजीनगर तालुक्यात राबविण्यात येणार आहेत. खरीप हंगामात बाजरीचे ७८० हेक्टरवर तर ज्वारीचे रब्बी हंगामात ३२० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.

याशिवाय तूर मूग उडीद प्रत्येकी १० हेक्टर, तूर अधिक सोयाबीन २० हेक्टर, मूग नंतर रब्बी ज्वारी १० हेक्टर, बाजरी नंतर हरभरा १० हेक्टर, मका ५० हेक्टर, मका अधिक तूर १० हेक्टर अशा एकूण १२३० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.

याशिवाय रोजगार हमी योजनेत फळबाग लागवडीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी सहायकाकडे अर्ज करावे. अधिकच्या माहितीसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी सहायकाकडे संपर्क करण्याची सूचनाही श्री. जाधव यांनी केली.

१४ हजार १४२ अर्जांची लॉटरीमध्ये निवड...

कृषी विभागाच्या सर्व योजना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन असून, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात आतापर्यंत शेतकऱ्यांनी २७ हजार ९७९ ऑनलाइन अर्ज केले. त्यापैकी १४ हजार १४२ अर्जांची लॉटरीमध्ये निवड झाली आहे. याव्यतिरिक्त १९४५ शेतकऱ्यांचे तपासणी पूर्ण होऊन अनुदानासाठी पाठवलेले आहेत.याशिवाय १८९४ अर्ज विविध स्तरावर छाननी प्रक्रियेत आहेत.

१११०६ पौष्टिक तृणधान्याच्या मिनी किट वाटप करणार

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त क्षेत्र तिथे पौष्टिक तृणधान्य ही संकल्पना या वर्षी राबविण्यात येणार आहे. त्याद्वारे विविध प्रकारचे एकूण ११ हजार १०६ पौष्टिक तृणधान्याची मिनी किट वाटप करण्यात येणार आहेत. यामध्ये ज्वारी मिनी किट ३ हजार ७०२, बाजरी ४ हजार ६३०, राळा ९२५, कोडो ९२५, कुटकी ४६२ व राजगिरा ४६२ या मिनी किटचा समावेश असणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT