Farmer Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Issues : राज्यात दररोज तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Maharashtra Farmer News: राज्यात दररोज तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. आत्महत्याचे सत्र सुरुच आहे. मराठवाड्यातील खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे.

Team Agrowon

Latur News : राज्यात दररोज तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. आत्महत्याचे सत्र सुरुच आहे. मराठवाड्यातील खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. शेतकरी संकटात आहे. पण सत्ता संघर्षात या प्रश्नांकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नाही.

शासनाने शासन आपल्या दारी हा उपक्रम बंद करुन या प्रश्नांकडे गांभिर्याने लक्ष द्यावे या करिता २६ जुलै रोजी शेतकऱ्याच्या तरुण मुलासह मुंबईत ‘शेतकरी शासनाच्या दारी’ जाणार आहोत, अशी माहिती शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

या वर्षी मृग, आद्रा व पुनर्वसु हे तिन्हीही नक्षत्र कोरडे गेले. पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे राज्यात अनेक विभागात पेरणी झाली नाही. मराठवाड्याची अवस्था फार बिकट आहे. या वर्षी खरिपाचा सिजन पूर्णपणे धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था फार चिंताजनक झाली आहे. तसेच कोणत्याच शेतीमालाला भाव नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे मागील वर्षभरामध्ये राज्यात ३ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

कृषी मूल्य आयोगाने सोयाबीनचा उत्पादन खर्च प्रतिक्विंटला सहा हजार ७७६ रुपये काढला आहे तर केंद्राचा हमी भाव चार हजार सहाशे रुपये आहे. कापसाचा उत्पादन खर्च आठ हजार ९६८ रुपये प्रतिक्विंटल आहे. तर हमी भाव सात हजार २० रुपये आहे.

धानाचा उत्पादन खर्च चार हजार ५३४ रुपये प्रतिक्विंटलला आहे तर हमी भाव दोन हजार २०३ रुपये आहे. उसाचा प्रति टन खर्च चार हजार तीन रुपये आहे तर हमीभाव तीन हजार १० रुपये आहे. म्हणजेच एक ते अडीच हजार रुपयांपर्यंत प्रति क्विंटलला तफावत असताना दिसत आहे. पण याकडे शासनाला लक्ष द्यायला वेळ नाही, असे पाटील म्हणाले.

शासनाला धोंडे जेवण

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे म्हणून अधिक मासानिमित्त २६ जुलै रोजीच मंत्रालयाशेजारी गांधी पुतळ्यासमोर शासनासाठी धोंडे जेवणाचे वतन देण्यात आले आहे. याच्या पत्रिकाही वाटप करण्यात आल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयाच्या वतीने हे धोंडे जेवण शासनाला दिले जाणार आहे, अशी माहिती पाटील यांनी या वेळी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Market Rate: सध्या हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा ८०० ते ११०० रुपयांपेक्षा कमी

Irrigation Management: सिंचन व्यवस्थापन अराजकतेच्या वळणावर

Smart Farming: पपई- मिरची- खरबूज पद्धतीतून उत्पन्नाचा हुकमी स्रोत

Dairy Farming Success Story: दुग्ध व्यवसाय हेच झाले माझे विश्‍व

Fertilizer Subsidy: खत अनुदान थेट शेतकऱ्यांना देणे शक्य; डीबीटी यंत्रणा उभारण्याच्या कृषिमंत्र्यांच्या सूचना

SCROLL FOR NEXT