Sangli Rain  Agrowon
ताज्या बातम्या

Sangli Rain Update : सांगलीतील तीन बंधारे पाण्यात

Latest Rain Update : कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याच्या पात्रात वाढ होत असल्याने कृष्णा नदीवरील म्हैशाळ बंधारा राजापूर बंधारा आणि दुधगाव खोची हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्याच्या पूर्व भागात गुरुवारी (ता. २०) सकाळपासून पावसाने उघडीत दिली होती. दुपारनंतर हलका पाऊस झाला. तर पश्चिम भागात दिवसभर पावसाची रिपरीप सुरू होती, शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम होता. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याच्या पात्रात वाढ होत असल्याने कृष्णा नदीवरील म्हैशाळ बंधारा राजापूर बंधारा आणि दुधगाव खोची हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कमीअधिक पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अधूनमधून हलक्या पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर काही अंशी पावसाचा जोर वाढला. पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे.

शिराळा तालुक्यात जोर वाढला आहे. चांदोली धरण क्षेत्रात पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. कोयना धरण परिसरात संततदार पाऊस असल्याने कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे.

त्याचप्रमाणे वारणा नदीची पाणी पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे कृष्णा नदीवरील म्हैशाळ, राजापूर आणि दुधगाव खोची हे बंधारे पाण्याखाली गेले. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १० मिमी पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंतच्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये ः मिरज ५.९ (८९.९), जत १.१ (७१.७), खानापूर-विटा ५ (६६.१), वाळवा-इस्लामपूर १८.४ (१०२), तासगाव ६.९ (१०६.६), शिराळा ४१ (२८८.५), आटपाडी १ (६५.५), कवठे महांकाळ २.१ (७३.१), पलूस १४.२ (८२.९), कडेगाव ९.७ (७८.२).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Integrated Nutrient Management: जमीन आरोग्यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक: डॉ. संग्राम काळे

Panchayat Raj Funding: जिल्हा परिषदेच्या पंचायत राज विभागाला निधीचा ‘बूस्ट’

Khandesh Crop Damage: खानदेशात जानेवारी, मार्च, एप्रिलमध्ये वादळात पिकांची हानी

Agriculture Challenges: शेतकऱ्यांसमोरील आव्हानाची लढाई एकजुटीतून लढावी लागणार: अजित नवले

Solapur Crop Insurance: पीक विम्याच्या लाभात ‘शेतकरी उपाशी, कंपन्या मात्र तुपाशी’

SCROLL FOR NEXT