Water Dam Agrowon
ताज्या बातम्या

‘म्हैसाळ’मधून उचलले साडेतीन टीएमसी पाणी

या आवर्तनाची १ कोटी ६२ लाखांची पाणीपट्टी वसूल ः मागणी असेपर्यंत आवर्तन सुरू राहणार

टीम ॲग्रोवन

सांगली ः म्हैसाळ उपसा सिंचनचे पहिले आवर्तन सुरू होऊन तीन महिने झाले आहेत. या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात पाणी पोहोचले आहे. आतापर्यंत अंदाजे साडेतीन टीएमसी पाणी उचलून दुष्काळी भागातील शेतीची तहान भागवली आहे. या आवर्तनाची सुमारे १ कोटी ६२ लाख इतकी पाणीपट्टी वसूल झाली
असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील अनेक भागांत पाणीटंचाई भासण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु केवळ तोंडी मागणी असल्याने ही योजना सुरू करण्यासाठी पाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला नाही. त्यासाठी शेतकऱ्यांकडून पाणी मागणीचा अर्ज करा, असा सल्ला पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना दिला.

दरम्यान, शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्जही दिले. परंतु त्याला प्रतिसाद कमी असल्याने या वर्षीचे पहिले आवर्तन सुरू करण्यासाठी अडचणी ठरत होत्या. त्यानंतर आवर्तन सुरू करण्यासाठी जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी पाटबंधारे विभागाला सूचना दिल्या. त्यामुळे ३ मार्च २०२० मध्ये म्हैसाळ योजनेचे पहिले आवर्तन सुरू झाले.

म्हैसाळ योजनेचे प्रत्येक टप्प्यातील हळू हळू पंपगृह सुरू करून दुष्काळी भागात पाणी सोडण्याचे नियोजन झाले. आता सहा टप्प्यांत सुमारे ६५ पंपाद्वारे पाणीउपसा सुरू आहे. हे पाणी मिरज, कवठे महांकाळ, तासगाव, जत तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यापर्यंत पोहोचले आहे. या योजनेतून
आतापर्यंत साडेतीन टीएमसी पाणी दुष्काळी भागात दिले असून पाणीपट्टीदेखील शेतकरी भरत आहेत.

मागणी असेपर्यंत पाणी सुरू ठेवणार
नदीत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने मागणी असेपर्यंत व पाऊस सुरू होईपर्यंतस ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू राहणार आहे. ‘म्हैसाळ’च्या पाण्यामुळे दुष्काळी भागात ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी उपलब्ध होऊन शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. मंगळवेढा तालुक्यात चिखलगी, शेवनांदगी, बावची, जंगलगी परिसरात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात येत असल्याचे ‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dharashiv Farmer Story: सरकारच्या ५ हजारांच्या अग्रिम मदतीवरुन नाराजी, शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना सोयाबीनची 'पट्टी'च केली मनी ऑर्डर

Integrated Farming: एकात्मिक शेती दुष्काळात फायदेशीर ठरेल : कुलगुरू खर्चे

Agriculture Irrigation Challenges: मोटारपंप बंदीच्या निर्देशांमुळे नवे संकट : किशोर वडेट्टीवार

Farmers Issue: कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती भोपळा : खासदार अमर काळे

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची चेष्टा होणार नाही, 'एनडीआरएफ'कडूनही मदत मिळेल- बावनकुळे

SCROLL FOR NEXT