Soybean Yellow Mosaic Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Yellow Mosaic : ‘येलो मोझॅक’मुळे तीन एकरांतील सोयाबीन प्रादुर्भावग्रस्त

Soybean Disease : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा शिवारात सोयाबीनच्या पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याने किसनदेव शेळके या शेतकऱ्याचे तीन एकरांतील पीक वाया गेले आहे.

Team Agrowon

Washim News : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा शिवारात सोयाबीनच्या पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याने किसनदेव शेळके या शेतकऱ्याचे तीन एकरांतील पीक वाया गेले आहे.

संपूर्ण पीक पिवळे पडले असून, उत्पादनाची आशा मावळली आहे. अधिकारी, कृषी तज्ज्ञांनी पाहणी करून मदतीची मागणी शेळके यांनी केली आहे.

खैरखेड शिवारात शेळके यांनी जून महिन्यात सहा एकरांत सोयाबीनची लागवड केलेली आहे.

त्यापैकी तीन एकरांतील फुले संगम या वाणावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झालेला आहे. १५ दिवसांपूर्वी याला सुरुवात झाली होती. दरदिवसाला हा प्रादुर्भाव वाढत गेला. शेतकऱ्याने यासाठी दोन वेळा कीडनाशकाची फवारणी केली असल्याचे सांगितले.

मात्र याचा काहीही फायदा झालेला नाही. या भागात इतरही शेतांमधील सोयाबीनच्या पिकावर प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. येलो मोझॅकमुळे पिकाची पाने पिवळी पडली असून, आता फूल व शेंगधारणा होण्याची शक्यता राहलेली नाही. कृषी अधिकाऱ्यांनी शेताला भेट देऊन पंचनामा करण्याची मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT