Sugarcane Season  Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Season : यंदाचा गळीत हंगाम दिवाळीनंतरच

Sugarcane Crushing : यंदा ऊस उत्पादन घटण्‍याचा अंदाज असल्याने यंदाचा हंगाम उशिरा सुरू होईल, असा अंदाज आहे.

Raj Chougule

Kolhapur News : यंदा ऊस उत्पादन घटण्‍याचा अंदाज असल्याने यंदाचा हंगाम उशिरा सुरू होईल, असा अंदाज आहे. नोव्हेंबरच्या मध्यानंतरच राज्यात गाळप वेगात होऊ शकते. अद्याप कोणत्याही कारखान्याने हंगाम लवकर सुरू करावा, अशी मागणी केली नाही. यामुळे यंदा राज्यातील उस गाळपाची सुरुवात उशिराच होईल, असे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.

साखर आयुक्‍तालयाच्या वतीने राज्यातील उसाचे क्षेत्र, संभाव्य उत्पादन याबाबत अंदाज घेण्यात येत आहे. मंत्री समितीच्या बैठकीत हंगाम सुरू करण्याबाबतचा निर्णय होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस क्षेत्रात फारशी वाढ नाही. यंदा खरी चिंता आहे ती उत्पादन घटीची. शिवारामध्ये ऊस दिसत असला तरी त्यातून किती उत्पादन निघेल याबाबत शाश्‍वती देता येत नसल्याची स्थिती आहे.

देशपातळीवरील संघटनांनी वर्तवलेला उत्पादन घटीचा अंदाज ऊस शिवारांची स्थिती पहाता खरा ठरण्याची शक्‍यता आहे. मुबलक पाण्याची सोय असणारे पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्हेही पाण्‍यासाठी तरसत आहेत. सांगलीसारख्‍या जिल्ह्यातही पाणी कमी पडत असल्‍याने कोयना धरणातून पाणी सोडण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

जे जिल्हे उसासाठी प्रसिद्ध आहेत त्‍या जिल्ह्यांमध्येही पाणीटंचाई आहे. विशेष म्‍हणजे जुलैच्या पंधरा दिवसांचा कालावधी वगळता पावसाळ्याचे तीन पैकी अडीच महिने कोरडे गेले याचा मोठा फटका उसाला बसण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्राबरोबर विदर्भ, मराठवाडा या भागांमध्येही पावसाने ऊस उत्पादकांची निराशा केली आहे. यामुळे उत्‍पादन किती घटेल याबाबतचा अंदाज येत नसल्याचे चित्र आहे.

सध्या सर्वच साखर कारखान्‍यांचे शेती विभाग नियोजनाच्या गडबडीत आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी उत्पादन घटीची चिंता आहे. उष्ण ढगाळ हवामामुळे हुमणी, तांबेरा, आदी रोग किडींचा प्रादुर्भाव होत आहे. अगोदरच पाण्याची टंचाई भरीस भर म्हणून रोग किडीच्या प्रादुर्भावामुळे उसाचे शिवार संकटात सापडले आहे. या पार्श्‍वभूमीवर उसाची वजनातील घट निश्चित मानली जात आहे.

कारखाने हंगाम उशिरा सुरू करण्यास अनुकूल

अनेक कारखाने नोव्हेंबरच्या मध्यानंतरच हंगाम सुरू करण्याबाबत आग्रही आहेत. लवकर हंगाम सुरू केल्यास कोवळा ऊस तोडला जातो, या उसाची रिकव्हरी व वजनही कमी भरत असल्याने त्याचा कोणालाच फायदा होत नाही.

या मुळे दिवाळीनंतरच हंगाम सुरू करण्याच्या मानसिकतेत कारखाने आहेत. मजूरही दिवाळीनंतर येण्यास राजी असतात. नोव्हेंबरमध्ये थंडीमुळे साखर उताऱ्यात वाढ होत असल्‍याने अनेक कारखाने नोव्‍हेंबरच्या उत्तरार्धातच हंगाम सुरू होण्‍याच्या अपेक्षेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Season : रब्बी विकसित कृषी संकल्प अभियानावर तज्ज्ञांचा बहिष्कार

Farmer Study Tour : शेतकरी परदेश अभ्यास दौऱ्याचे अनुदान वाढवा

Cabinet Meeting Maharashtra : यंदा तरी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात घ्या

Sugarcane Farming : राज्यात सलग पावसामुळे ऊसपट्ट्यावर संकटाची छाया

Farmers Protest : कापूस उत्पादकासाठी उभारणार लढा

SCROLL FOR NEXT