Sugarcane season : हंगाम सुरू झाल्‍यानंतर साखर निर्यात परवानगीबाबत उद्योग आशावादी

Sugarcane Crushing Season : साखर उत्पादन घटीच्या अंदाजामुळे केंद्र सरकार सध्या निर्यातीला अनुकूल नसले तरी देशातील साखर उद्योग मात्र आशावाद बाळगून आहे.
Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : साखर उत्पादन घटीच्या अंदाजामुळे केंद्र सरकार सध्या निर्यातीला अनुकूल नसले तरी देशातील साखर उद्योग मात्र आशावाद बाळगून आहे. हंगाम सुरू झाल्‍यानंतर हंगामाच्या मध्यालाच केंद्र निर्यातीबाबतचा सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा कारखानदारांच्या संघटनांना आहे. ज्या वेळी हंगाम सुरू होईल त्याच वेळी परिस्‍थिती पाहून केंद्राने परवानगी द्यावी, अशी मागणी ऑक्टोंबरमध्ये सरकारकडे पुन्हा करू, असे इंडियन शुगर मिल्‍स असोसिएशने (इस्मा) म्हटले आहे. जानेवारीत थोड्या प्रमाणात का होईना निर्यातीला केंद्र अनुकूल असेल, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने म्हटले आहे.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Season : ...अन्यथा कारखान्यांना एकही ऊस तोडणी मशीन देणार नाही ; जाधव

विविध संस्‍थांनी सध्‍याची अवर्षणाची परिस्थिती पहाता देशात साखर उत्पादन घटण्याचा अंदाज व्‍यक्त केला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सध्या तरी निर्यातीला परवानगी देण्याच्या विचारात नाही. अजून प्रत्यक्षात हंगाम सुरू नसल्‍याने या हंगामात निर्यात होणारच नाही, असे म्हणणे घाईचे ठरू शकते, असा एक मतप्रवाह साखर उद्योगातील तज्ज्ञांचा आहे. सध्या पुढील निर्णयांचे भाकित केवळ अंदाजावर सुरू आहे. अजूनही पावसाळ्याचे काही दिवस शिल्लक आहेत. तसेच हंगाम सुरू होण्यासही एक ते दीड महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीत चांगला पाऊस झाल्‍यास उसाला ते फायदेशीर ठरेल, अशी आशा साखर उद्योगाला आहे.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Season : ऊसबिले देण्यास २६ साखर कारखान्यांकडून चालढकल

या पूर्वी केंद्राने साखर निर्यातीबाबतचे निर्णय हंगाम सुरू झाल्‍यानंतरच घेतले आहेत. देशात साधारणतः २७५ लाख टन साखरेची गरज असते. ३३० लाख टनांपर्यंत उत्पादन झाल्‍यास ४० लाख टन साखर शिल्लक राहू शकते. हंगामापूर्वीची साखर व हंगाम पूर्ण झाल्‍यानंतरची साखर याचा हिशेब घालून काही प्रमाणात तरी केंद्र निर्यातीला परवानगी देऊ शकते, असे काही तज्‍ज्ञांचे मत आहे. सध्‍याच्या परिस्थितीत मात्र साखरेला चांगला दर मिळण्यापेक्षा बाजारात साखरेच्या दरात वाढ होऊ नये यालाच केंद्र प्राधान्य देत आहे. केंद्राच्‍या या भूमिकेबाबत मात्र साखर उद्योगात नाराजी आहे. केंद्राने ही भूमिका हंगाम सुरू झाल्यानंतर तरी तातडीने बदलावी, अशी मागणी उद्योगाची आहे.

निर्यातीला परवानगीला अडथळे आणणाऱ्या बाबी

  • पश्चिम महाराष्ट, कर्नाटकातील आघाडीच्या ऊस उत्पादक प्रदेशात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

  • या भागातील उसाच्या वाढीवर विपरित परिणाम

  • अपेक्षेइतकी वाढ नसल्याने याचा परिणाम गाळपावर होणार

  • निर्यातीला परवानगी दिल्‍यास कारखाने निर्यातीला प्राधान्य देतील

  • निर्यातीमुळे साखरेची चणचण भासून देशात किमती आवाक्याबाहेर जातील यामुळे महागाई वाढण्याची केंद्राला भीती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com