Bedana Market  Agrowon
ताज्या बातम्या

Bedana Market : गोड बेदाणा होतोय कडू

Bedana Rate : ६० हजार टन विक्री ः शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा

Team Agrowon

अभिजित डाके : अॅग्रोवन वृत्तसेवा
Sangli Raisins Market : बेदाण्याचे (Raisins) अतिरिक्त झालेले उत्पादन आणि बाजारात मागणीपेक्षा बेदाण्याचा पुरवठा अधिक याचा परिणाम बेदाण्याच्या दरावर झाला आहे.

परिमाणी बेदाण्याच्या दरात ((Raisins) Rates) सुधारणा होण्याची चिन्हे सध्यातरी नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीतही यंदा साडेतीन महिन्यांत बेदाण्याची विक्री अंदाजे ६० हजार टन झाली आहे.

परिणामी, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून बेदाण्याच्या दरात घसरण झाली.

हंगाम सुरू झाल्यापासून प्रत्येक महिन्याला सुमारे २० रुपयांनी दर कमी झाल्याने बेदाणा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गोड बेदाणा कडू होत असून, दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

राज्यात यंदा बेदाण्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. या वर्षी अंदाजे २ लाख ८० टन इतका बेदाणा तयार झाल्याचा अंदाज व्यापारी आणि बाजार समितीने लावला आहे. वास्तविक, वर्षभर बेदाणा विक्रीचे नियोजन टप्प्याटप्प्याने शेतकरी करत असतो.

नव्या हंगामातील बेदाणा विक्री फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाली. सुरुवातीच्या काळात बेदाण्याची आवक कमी असल्याने बेदाण्याला प्रति किलोस २०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून बेदाण्याच्या आवकीत वाढ होऊ लागली. त्यामुळे बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा अधिक होण्यास झाला. याचा परिणाम बेदाण्याच्या दरावर झाला.

प्रत्येक आठवड्याला प्रति किलोस पाच ते दहा रुपयांनी दरात घसरण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दर कमी होऊ लागल्याने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली.

साडेतीन महिन्यांत अंदाजे ६० हजार टन बेदाणा विक्री झाला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बेदाण्याला प्रति किलोस ७० रुपयांपासून ते २३० रुपये असा दर होता.

फेब्रुवारीत बेदाण्याच्या दरात २० रुपयांनी घसरण झाली. मार्च आणि एप्रिलमध्ये २० आणि ३० रुपयांची घसरण झाली.

मे महिन्यात ३० रुपयांनी दर कमी झाले. अर्थात बेदाण्याला प्रति किलोस २३० रुपये मिळणारा दर सध्या १३० रुपये प्रति किलो मिळत आहे.

उत्पादन वाढीचा फटका
गेल्या वर्षी बेदाण्याला १८० ते १९० रुपये दर मिळाला होता. यंदाही असाच दर मिळेल अशी आशा होती. परंतु उत्पादन वाढीचा फटका दराला बसला. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकरी बेदाणा विक्री करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.

कमी दरात बेदाणा विक्री करून आर्थिक तोटा सहन करण्यापेक्षा दर वाढीची प्रतीक्षा करू लागला आहे.

उत्पादनाच्या १५ टक्के उच्च दर्जाचा बेदाणा
यावर्षी बेदाणा निर्मितीस पोषक वातावरण नाही. परिमाणी उच्च दर्जाचा बेदाणा तयार होण्यास अडचणी आल्या.

परंतु त्यातूनही उच्च दर्जाचा बेदाणा शेतकऱ्यांनी तयार केला आहे.

उत्पादनाच्या सुमारे १५ टक्के उच्च दर्जाचा बेदाणा असून त्यामध्ये गोडी आणि गर चांगला असल्याने त्या बेदाण्याला १५० पासून २०० रुपये प्रति किलो दर मिळत आहे.

या वर्षी १५ टन बेदाण्याचे उत्पादन झाले आहे. यंदा बेदाण्याला १८० रुपये दर मिळेल अशी अपेक्षा होती. पण दर कमी असल्याने बेदाणा विक्री केला नाही. बेदाण्याच्या दरात वाढ होईल याची प्रतीक्षा करत आहे.
- संजय पाटील, बेदाणा उत्पादक शेतकरी, जिरग्याळ, ता. जत

बेदाण्याचे उत्पादन वाढले असून चांगल्या दर्जाचा बेदाणा असून चांगल्या दर्जाच्या बेदाण्याला चांगले दर आहेत. सध्या उच्च दर्जाच्या बेदाण्याला १५० पासून २०० रुपये प्रति किलो दर आहे. हे दर टिकून राहतील.
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

Parbhani Voting Percentage : परभणी जिल्ह्यात सरासरी ७१.४५ टक्के मतदान

Rabi Sowing : रब्बी पेरणीला वेग, हरभऱ्याची लागवड जोरात

Vote Turnout : मतदानाचा टक्का वाढला, आता लक्ष निकालाकडे

Rabi Sowing : जालन्यात रब्बीची निम्मी पेरणी

SCROLL FOR NEXT