Raisin Market : कवठेमहांकाळमध्ये एक हजार टन बेदाणा मातीमोल

कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज परिसरात बेदाणा निर्मितीची लगबग सुरु होती. अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
Raisin Market
Raisin MarketAgrowon
Published on
Updated on

Sangli News : कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज परिसरात बेदाणा निर्मितीची (Raisin Production) लगबग सुरु होती. अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अन् एका क्षणात सुमारे लाखो रुपयांचा एक हजार टन बेदाणा भिजला. त्यामुळे पंचनामे करून त्याची भरपाई द्यावी, अशी मागणी बेदाणा उत्पादकांनी केली आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज परिसर हा बेदाणा निर्मितीचे हब म्हणून ओळखला जातो. या परिसरात सुमारे ३ हजाराहून अधिक बेदाणा निर्मितीचे शेड आहेत. डिसेंबर ते जानेवारीपासून बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरु होतो.

Raisin Market
Raisin Market : ढगाळ वातावरणामुळे बेदाणा उत्पादक धास्तावला

यंदा द्राक्षाला अपेक्षित दर नसल्याने शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळले. यापूर्वी ढगाळ वातावरणाचा फटका बसला होता. परंतु सध्या नेमकी शेडवर बेदाणा निर्मितीची लगबग सुरु असताना अवकाळीने बेदण्यास दणका दिला आहे.

पाण्यासोबत बेदाणाही गेला वाहून

सध्या बेदाणा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सुमारे ३०० हून अधिक शेडवर बेदाणा निर्मितीचे काम सुरु होते. वॉशिंग केलेला बेदाणा वाळत घातला होता. शुक्रवारी (ता.१४) दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

Raisin Market
Raisin Market : बेदाण्याचे दर टिकून; निम्मा हंगाम उरकला

त्यात बेदाणा भिजला. पाण्यासोबत बेदाणाही वाहून केला. बेदाण्यात पाणी साचले. भिजलेल्या बेदाण्याचा काहीच उपयोग नाही. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे बेदाणा काळा पडतो. त्यामुळे त्याचा दर्जा घसरतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

शेडवर सुमारे १५० टन बेदाणा निर्मितीचे काम सुरु होते. त्यापैकी सुमारे ३० ते ४० टन बेदाणा तयार झाला होता. सगळा बेदाणा भिजला.

- सुनील माळी, शेड मालक, केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

द्राक्षाला अपेक्षित दर नसल्याने बेदाणा तयार करण्याचा निर्णय घेतला. पण शेवटच्या टप्प्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. २५ टन तयार बेदाणा भिजला. पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.

- योगेश मंडलिक, शेतकरी, राजेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com