Onion Rate Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate: कांदा निर्यातीवर बंदी नाहीच; वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी सुप्रिया सुळेंवर साधला निशाणा

सध्या कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी कांद्याच्या निर्यातीला चालना द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून होत आहे.

Team Agrowon

Onion Market Rate सध्या कांद्याचे दर (Onion Rate) पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी कांद्याच्या निर्यातीला (Onion Export) चालना द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून होत आहे. परंतु सध्या कांदा निर्यातीवर बंदी (Ban On Onion Export) नाही, चालू वर्षात कांदा निर्यात वाढली आहे, असा खुलासा केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी केला आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने एक निवेदन काढून कांदा निर्यातीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ५२३.८ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मूल्याची कांदा निर्यात झाली. आधीच्या वर्षीच्या तुलनेत निर्यात १६.३ टक्के वाढल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शनिवारी (ता. २५) ट्विट करून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडल्या होत्या. केंद्र सरकारचे आयात-निर्यात धोरण अस्थिर असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरची बंदी तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी खा. सुळे यांनी केली होती.

सुप्रिया सुळे यांच्या टिकेला वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर दिले आहे. ‘‘भारतातून कोणत्याही देशात कांदा निर्यात करायला बंदी नाही. परंतु यासंदर्भात नेमकी उलट विधाने केली जाणे दुर्दैवी आहे. वास्तविक जुलै ते डिसेंबर २०२२ या कालावधीत कांदा निर्यात वाढती राहिली आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे," अशा आशयाचे ट्विट गोयल यांनी केले आहे.

निर्यातीबद्दल नेमकी स्थिती काय?

भारतातून कांदा निर्यातीला बंदी नाही, हे वाणिज्य मंत्रालयाचे म्हणणे योग्यच आहे. परंतु भारतातून प्रामुख्याने आखाती आणि आग्नेय आशियाई देशांनाच कांदा निर्यात केला जातो. देशात सध्या कांद्याचा पुरवठा प्रचंड वाढला आहे.

त्या तुलनेत कांद्याची निर्यात खूपच तुटपुंजी आहे. त्यामुळे निर्यात सुरू असूनही कांद्याच्या दरात सुधारणा होत नाही, असे बाजार अभ्यासकांनी सांगितले.

आफ्रिकी देशांना कांदा निर्यातीसाठी भरपूर वाव आहे. परंतु या देशांमध्ये भारताकडून खूपच कमी प्रमाणात निर्यात होते. अपेडाच्या माहितीनुसार २०२१-२२ मध्ये सर्व आफ्रिकी देशांमध्ये १३ हजार ६८० टन कांदा निर्यात झाला होता.

त्याचे रुपयातील मूल्य होते ३८ कोटी ६८ लाख रूपये. त्या वर्षीच्या एकूण कांदा निर्यातीशी हे प्रमाण केवळ ०.८ टक्के होते. चालू आर्थिक वर्षांत डिसेंबरपर्यंत आफ्रिकी देशांना केवळ ९१९७ टन कांदा निर्यात झाला. त्याची रूपयातील किंमत भरते २४ कोटी ७० लाख रूपये.

यासंदर्भात शेतीमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण म्हणाले, ‘‘आफ्रिकी देशांतील भारतीय कांद्यासाठीचे निर्यात मार्केट हे सध्याच्या तुलनेत कैक पटीने वाढू शकते. इंडियन ओरिजनच्या कांद्याला आफ्रिकी ग्राहकांची चांगली पसंती मिळते.

मात्र, तिथे भारतीय व्यापारी-निर्यातदारांची थेट पोच नाही. दुबई रूटने काही आफ्रिकन देशांना कांदा पोच होतो. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक विभागातील लोकप्रतिनिधींनी वाणिज्य मंत्रालयाच्या माध्यमातून आफ्रिकी देशांमध्ये निर्यातवृद्धीसाठी प्रयत्न करायला हवेत.''

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT